Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ तिसा सलासीन मया अलफ, सन ११४८ फसली,
अवल साल छ १६ सफर, २५ में १७३८,
जेष्ठ वद्य ३ शके १६६०

छ २९ सफर (७ जून १७३८) अवलसाल चिमाजी अप्पा स्वारीहून पुण्यास दाखल झाले. छ ७ र॥खर (१४ जुलै १७३८) श्रीमंत हिंदुस्थानचे स्वारीहून पुण्यास आले. छ २४ जमादिलावल (२९ आगष्ट १७३८) स्वारीस निघाले. जेजुरीपर्यंत गेले. छ १८ रजब (२१ अक्टोबर १७३८) तासगांव घेतल्याची खबर श्रीमंतांकडून पुण्यास आली. छ २४ साबान [२६ नोव्हेंबर १७३८] चिमाजी अप्पा स्वारीस निघाले ते छ २८ रमजानात [२९ डिसेंबर १७३८]. कोंकणप्रांतीं माहिमास जाऊन लढाईत दाखल झाले. छ ५ सवाल [५ जानेवारी १७३९] राणोजी शिंदे याणीं डाहाणू घेतल्याचें वर्तमान आलें. छ २४ सवाल [२४ जानेवारी १७३९] बाजीभिवराव शेलूकर तारापूरचे हल्ल्यांत ठार झाले. किल्ले अशरी फत्ते झाली, छ २ जिल्काद (२१ फेब्रुवारी १७३९). छ ६ जिल्काद [५ फेब्रूवारी १७३९] बदलापारडी फत्ते झाली. छ ११ जिल्काद [१० फेब्रुवारी १७३९] वेसवे फत्ते झाल्याचें खंडेराव माणकर याजकडून पत्र आलें. श्रीमंत स्वारीस निघाले. (११ फेब्रुवारी १७३९) छ १२ जिल्काद. छ १८ जिल्काद (१७ फेब्रुवारी १७३९) शिदोला किल्ला मखमूल अलमखान यास दिला. छ ६ जिल्हेज (६ मार्च १७३९) धाराशीव घेतल्याचें वर्तमान आलें. छ ६ जिल्हेज चिमाजी अप्पांनी वसईस मोर्चे लाविले. छ ७ जिल्हेज (७ मार्च १७३९) व्यंकटराव नारायण याजकडून फोंडा मर्दनगड किल्ला घेतल्याचें वर्तमान आलें. छ १४ जिल्हेज (१४ मार्च १७३९) रामचंद्र हरी पटवर्धन यास वसई मुक्कामीं पालखी दिली. व गोविंद हरी यास सरदाराची वस्त्रें दिली अप्पांनी. छ १५ जिल्हेज (१५ मार्च १७३९) वांद्रे पाडावयास आरंभ केल्याचें वर्तान धुळ्यास आलें. पोर्चुगीज लोकांचें व मराठ्यांचें युध्द होत असतां सेनासाहेब सुभ्याच्या पुतण्यानें कोणाची आज्ञा न घेतां अलाहाबादपर्यंत स्वा-या करून मुलूख लुटला. त्याजवर आवजी कवडा यास पाठविलें असतां त्याचा पराभव त्यानें केला. मग बाजीराव याचा सूड उगवावयास निघाले तों इतक्यात वर्तमान आलें कीं, नादिरशहा बादशहा इराणचा दिल्लीस येऊन त्यानें मोंगलाचा पराभव केला, व दिल्लीची खंडणी बादशहास मागूं लागला व खानडौरानही मयत झाला असे ऐकिलेवर पुढे जात असतां पुढें असें वर्तमान कळलें की, नादिरशहाने दिल्लीबादशहा महंमदशहा यास कैद केलें व आठ हजार लोक ठार मारिले, आणि शहर लुटलें, आणि तो लक्ष फौज जमा होऊन दक्षिणेंत येत आहे, असें समजलें. तेव्हां चिमाजी अप्पा यास कोंकणातून बोलावून बराबर घेऊन लोकांस विदित केलें की, जे कोणी हिंदू, मुसलमान असतील त्यांणी येऊन माझें साहाय्य करावें. याप्रें॥ होळकर व शिंदे यासमयी श्रीमंतांस मिळाले. इतक्यांत वर्तमान आलें की, तो नादिरशहा आपले मुलखी स्वसंतोषें जाऊन पहिला दिल्लीबादशहा मला मान्य, माझे बंधूप्रे॥ आहे, व याचे आज्ञेंत सर्वांनी वागावें, जर कोणी असें न करील तर मी माघारा येऊन त्याचें पारपत्य करीन, याप्रें॥ जालें. हे वर्तमान बाजीरावसाहेब यांस छ २४ सफर रोजी (२२ मे १७३९) पाच्छाइ यांजकडून फरमान घेऊन काशीद घेऊन आले. मुक्काम जेनाबाद येथें आले छ ३ सफरी (१ मे १७३९) बसविले ह्मणून. नादिरशहा दिल्लींत सन १७३९ चे नवंबरांत येऊन मार्च सन १७३९ साली दिल्लीत कत्तल केली होती. वसई प्रांतांतील बहुतेक महाल सर जाले. परंतु मुख्य वसई किल्ला हस्तगत होण्याचे कामीं पेशवे यांनी बहुत प्रयत्न चालविला. तो असा कीं, सन १७३९ चे फेब्रुवारी महिन्याचे १७ वे तारखेस चिमाजी अप्पाचा बिनीवाला शंकराजी नारायण याणें खुषकीवरून व आंग्रे यांनी पाण्याचे बाजूनी असा चोहोंकडून वेढा घातला.