Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ सीत सलासीत मयाव अलफ, सन ११४५
फसली, अवल साल छ १३ मोहरम, २५
मे १७३५, ज्येष्ठ शुध्द १५ शके १६५७.

छ २४ मोहरम रोजीं [५ जून १७३५] पिलाजी जाधवराव यांची स्वारी पुण्यास परत आली. छ १७ सफर रोजीं (२८ जून १७३५) चिमाजी अप्पा स्वारीस निघोन छ १० रविलावल (२० जुलै १७३५) पंढरीस जाऊन माघारे आले. छ २९ सफर रोजीं (१० जुलै १७३५) दादासाहेब यांचे पाठीवर जनार्दनपंत याचा जन्म झाला. व्यतीपात होता. छ ५ रविलाखर रोजीं (१३ आगष्ट १७३५) श्रीमंतांची स्वारी साता-यास गेली. छ १५ जमादिलावलपर्यंत [२२ सप्टंबर १७३५] होती. छ म॥ परत आले. छ ७ जमादिलाखर रोजीं [१३ अक्टोबर १७३५] स्वारीस निघून अप्पासुध्दा नारायणगांवपर्यंत जाऊन छ २० रजब रोजीं [२५ नोव्हेंबर १७३५] अप्पा परत आले. श्रीमंत हिंदुस्थानांत गेले अजमीरपावेतों. छ २१ जमादिलाखर [२७ अक्टोबर १७३५] पिलाजी जाधवराव यांची स्वारी झाली. परंतु ते स्वत: गेले नाहींत. व सटवाजी जाधवराव गेले ह्मणून स्वारी बाजी भिंवराव असें लागलें. छ ४ रजब [९ नोव्हेंबर १७३५] किल्ले माहुली हें स्थळ बाळाजी गोविंद व खंडपाटील झुंजारराव व जानजी कराला याणीं सरकारांत हस्तगत करून दिलें, ह्मणून कांहीं इनाम देण्याचें ठरलें. छ १५ साबान रोजीं [१९ डिसेंबर १७३५] उष्टावण जनार्दनपंत याचें झालें. छ १ रमजान रोजीं [४ जानेवारी १७३६] चिमाजी अप्पा साता-यास गेले. नंतर जेजुरीस जाऊन महाराजांची भेट घेऊन छ २४ रमजानांत [२७ जानेवारी १७३६] परत आले पुण्यास. छ २९ रमजानांत [१ फेब्रुवारी १७३६] नवीन दिवाणखान्यांत मुहूर्त करून गेले. छ २९ सवाल [२ मार्च १७३६] मुंज सदाशिव चिमणाजी याची झाली. छ १७ जिल्काद [२० मार्च १७३६] चिमाजी अप्पा साता-यास गेले ते मुकामास येऊन परभारें कोंकणांत शामलावर गले. चरईहून अली बागेकडून तळे घोसाळ्यास जाऊन छ २० मोहरम रोजीं [२१ मे १७३६] पुण्यास आले. आवजी चिटणीस मेले, सबब पुत्रास दुखोटा केला, छ १४ जिल्हेज [१५ एप्रिल १७३६] छ १८ जिल्हेज [१९ एप्रिल १७३६] शामलाशीं युध्द झालें. सिध्दी सात हब्शी बुडविल्याची खबर अप्पाकडून आली. कामारल्यास लढाई होऊन युध्दांत ठार पडला. व सिध्दी याकूब उदेरीचा किल्लेदारही ठार पडला. मु॥ चरईनजीक रेवास. छ १४ जिल्हेज [१५ एप्रिल १७३६] बाजीरावसे॥ प॥ अजमर पुष्कराज येथें गेले होते. छ ६ मोहरम रोजीं [७ मे १७३६] हब्शी मारल्याचें वर्तमान बाजीराव यांस कळलें मु॥ झुजारा. छ २२ मोहरम रोजीं [२३ मे १७३६] बाजीराव यांचा मुक्काम डंग पे॥ गंगराड येथें होता. कंठाजी कदम याचा अंमल उठून सर्व गुजराथची चौथ दमाजी गाइकवाड याजकडे झाली.