Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ खमस सलासीन मयाव अलफ, सन ११४४
फसली, अवल साल छ ३ मोहरम, २५ मे
१७३४, ज्येष्ठ शुध्द ४ शके १६५६.
माळव्यांत महमदखान बंगष मयत झाल्यावर तो अधिकार व आग्रा या दोहो अधिकारांवर बादशहा दिल्ली याणें राजा जयसिंग यास सन १७३४ सालीं पाठविला. त्याचा व बाजीरावसाहेब यांचा पूर्वीपासून स्नेह होता. ह्मणोन ती जागा त्यास मिळाल्यानें मराठे बहुत संतोष मानूं लागले. परंतु तो बादशहाचा हस्तक ह्मणून मराठ्याचें सारें बोलणें मान्य करीना. नंतर त्याच्यापुढचे वर्षी बाजीराव याचें व त्याचें बोलणें होऊन माळवा प्रांत बाजीरावसाहेब यास दिल्हा. व बादशहासही समजावून तोही वश केला. परसोजी भोसले याचे पुत्र कान्होजी व दुसरे परसोजी व तिसरे साबाजी. त्या साबाजीस संतान नाहीं. त्याची बायको राजाऊ साता-यास राहत असे. त्यास राजाऊचा गोट असें ह्मणतात. परसोजीचे पुत्र संताजी व राणोजी भोसले. पैकीं संताजी दिल्लीस बाळाजी विश्वनाथ याजबरोबर गेले होते, ते लढाईत ठार झाले. बिंबाजी भोसले वडील स्त्रीस पुत्र रघोजी भोसले याप्रमाणें असोन कान्होजी भोसले याणीं महाराजाची अवज्ञा केली. सबब त्यास कैद करून रघूजीस पदाची वस्त्रे दिली. तो शिकारीचे कामास मोठा धीट असे. शाहूमहाराज यांणीं आपले बायकोची बहीण शिर्क्याची कन्या यासी दिली, व व-हाडची सुभेदारी सांगितली. त्याजबद्दल त्याजकडून नेहमीं पांच हजार स्वारांनिशीं चाकरी करावी, असें ठरवून दरसाल नऊ लक्ष रुपये पोत्यास पावते करावे. याशिवाय पेशवे मोहिमेस निघतील, त्यावेळीं त्यांजबरोबर दहा हजार स्वारांनिशी जावें असें ठरविलें. छ ६ रविलावल [२६ जुलै १७३४] बाजीरावसाहेब साता-यास गेले. छ १५ साबान [३० डिसेंबर १७३४] साता-याकडून सुप्यावरून पुण्यास आले. छ १ रजब [१७ नोव्हेंबर १७३४] पिलाजी जाधव स्वारीस निघाले ते अखेरसालपर्यंत हिंदुस्थानांत होते. पेस्तर सालीं छ २४ मोहरम रोजीं [५ जून १७३५] पुण्यास परत आले. छ २९ रमजान [१२ फेब्रुवारी १७३५] मु॥ सागरतलाव पे॥ ओंडसे येथें कमरोदिन याजबरोबर लढाई झाली, वि॥ पिलाजी जाधव. कान्होजी आंग्रे यास दोन पुत्र. वडील सेखोजी कुलाब्यांत व धाकटा संभाजी सुवर्णदुर्गास याप्रें॥ होते. कान्होजीस आणखी नाटकशाळेचे तीन पुत्र; तुळाजी, येसाजी व मानाजी असे तीन कान्होजी शके १६५० सालीं वारले. सेखोजीस वस्त्रें झालीं. नंतर लागलीच शके १६५५ सालीं सेखोजीही वारले. तेव्हां संभाजीस पदाचीं वस्त्रें झालीं. तेव्हां त्यानें आपले सावत्र तिघे भावांपे॥ तुळाजीस आपलेजवळ ठेऊन येसाजीस मुलखाचा बंदोबस्त सांगितला, व मानाजीस किल्ल्याचा व फौजेचा बंदोबस्त सांगितला. तेव्हां त्या उभयतांध्यें कांहीं कलह झाल्यावर मानाजीनें कपट करून फिरंगी लोक किल्ल्यांत आणून तुळाजीस दिवाणगिरी देऊन कुलाब्यास येऊन रात्री किल्ल्यास शिड्या लावून आंत उतरून येसाजीचे डोळे काढले, आणि बंदींत टाकलें. नंतर संभाजी मानाजीचे पारपत्यास गेला. तेव्हां मानाजीनें पेशवे यांस साहाय्याकरितां बोलाविलें. त्यावरून छ २१ रमजान रोजीं [४ फेब्रुवारी १७३५] स्वारी कुलाब्यास गेली, पेशवे यांची. तेथें छ २० जिल्कादपर्यंत [३ एप्रिल १७३५] होती. स्वारी कुलाब्यास गेल्यावर छ १६ सवाल रोजीं [१ मार्च १७३५] राजमाची व छ २० रमजान रोजीं [३ फेब्रुवारी १७३५] कुलाबा व छ २२ रमजान रोजीं [५ फेब्रुवारी १७३५] खांदेरी किल्ला पेशवे यांणीं सर केला. पुढें छ १२ सवाल रोजीं [२५ फेब्रुवारी १७३५] किल्ला कोहाला फत्ते केला. पुढें याच सालीं मानाजी आंग्रे यांशीं तह झाला. त्यांत मामलेपाल किल्ले, सरसाट, मृगगड व किल्ले राजमाची व कोपनगड व किल्ल्याखालील महाल तर्फ चौपळ बारोटी व पे॥ नसरापूर पोट तर्फ सु॥ अंमल पेशवे यांजकडे आला. बाकी कुलाबा वगैरे ठाणीं आंग्रे याजकडे दिलीं. हा तह नवदरे अलीबाग मुक्कामीं झाला. मानाजीस कुलाबा देऊन वजारतमाब किताब दिल्हा, व संभाजीस सरखेल असा किताब देऊन पेशवे यांणीं तंटा तोडला. अंबाजीपंत पुरंदरे काशीस गेले. मुतालिकीवर हुजूर दादोपंत वाघ होते. भाद्रपद शु॥ १४ वारले. [२१ आगस्ट १७३४] माहुली मुक्कामीं. आनंदनाम संवत्सरीं रघुनाथराव यांचा जन्म, मिति श्रावण शु॥ १३ [१आगस्ट १७३४].