Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
पेशव्यांची शकावली
इ. स. १७२० पासून १७४० पर्यंत.
बाजीराव बल्लाळाची हकीकत.
सु ॥ इहिदे अशरीन मया व अलफ, सन ११३० फसली,
अवल साल छ २७ रजब, २५ मे १७२०,
वैशाख वद्य १३ शके १६४२.
खंडेराव दाभाड्या मेला. त्याचा पुत्र त्र्यंबकराव दाभाडे याशीं सन १७२१ में महिन्यांत सेनापतीपदाची वस्त्रें झालीं. उमाबाईचे मदतीने चालविले. गुजराथ, काठेवाड वगैरे अंमल सांगितले. खंडेराव मरण्याचे अगोदर त्याचा सरदार दमाजी गाइकवाड होता. त्याने मोठे शौर्य केले. ह्मणून खंडेराव याणें शाहू महाराजास सांगितले. सबब शाहू महाराज यांनी खंडेराव याचे हाताखाली दुसरा अधिकार देऊन समशेर बहादूर असा किताब दिला. तो बडोद्याचे गायकवाडाचा मूळ पुरुष. तो दमाजी, खंडेराव दाभाडा मेला त्याच सामारास, मृत्यू पावला. याचे जागी त्याचा पुतण्या पिलाजी गायकवाड यास बसविला. संस्थान जंजिरा याचा अंल शिद्दिसात याजकडे आहे. त्याणें दक्षिण कोंकणात बहुत धामधूम केली. त्याचे पारपत्यास चिमणाजी बल्लाळ यास पाठविलें. त्याचे तैनातीस विठ्ठल१६ शिवदेव विंचूरकर यास दिले होतें. त्यांनी लढाई करून त्याचे घोडे आपले हस्तगत करून आणिले. छ ४ सफर१७ १७+ रोजी (२५ नोव्हेंबर १७२०) बाजीराव साहेब साता-यास गेले. पुढे छ २५ सफर रोजी (१७ डिसेंबर १७२०) निघून मोगलाईत गेले. नंतर सुप्यास येऊन दोन महिने होते. छ १६ रबिलावल रोजी (६ जानेवारी १७२१) निजामउन्मुलुख याची भेट मु ॥ सावर्डिया पे ॥ उंदिरगांव येथे झाली. मोहरम (आक्टोबर-नोव्हेंबर १७२०) महिन्यांत बारामतीवर लढाई झाली. भाद्रपद मास (सप्टंबर-अक्टोबर १७२०) मुक्काम सासवड. रमजान (जून-जुलै १७२०) महिना व-हाड प्रांती होते.