Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
याशिवाय साहोत्रा व नाडगौकी हे हक्क राजाचे होते, त्यापैकीं साहोत्रा पंतसचिव यास दिल्हा, नाडगौकी दुसरे कोणास दिल्ही. आता चौथाई, मोकास वगैरे वजा होऊन बाकी राहिले यांत फौजदारी एक हिस्सा फौजदाराचा हक्क, बाकी दोन हिस्से पातशाही हक्क तो सरकारचा असें ठरविलें. तो जहागीर अंमल असे पुढें ह्मणू लागले. पुरंधर किल्यावर पंतसचिव याजकडून बापूजी श्रीपत होते, त्यांस पुण्याचे कारभारावर ठेविले. संताजी भोसला दिल्लीवर ठार झाला. तो परसोजी भोसला याचा दासीपुत्र होता. छ २३ साबान रोजी पुत्र बाजीराव सुध्दा साता-यास निघाले. (३० जून १७१९) छ ७ रबिलाखर मुक्काम यमुना दक्षिणतीरास होता. (१६ फेब्रुवारी १७१९).
श्री. (११ आक्टोबर १७१८)
म॥ अनाम देशमुख व देशपांडे प्रांत पुणें यांसी :-
बाळाजी पंडित प्रधान. सु॥ तिसा अयर मया व अलफ. दिल्हें अभयपत्र ऐसाजे :-
तुह्मी हुजूर येऊन विदित केलें की, दुतर्फा दिवाणाचे कसालियाकरितां तमाम मुलूख खराब पडला. तो आबाद करावयाविषयी आज्ञा केली. त्यास तुह्मी अर्ज केला की, पूर्वी मोंगलाचे धामधुमीमुळे मुलूख पडला. अलीकडे थोरात, ढमढेरे, निंबाळकर व किरकोळ यांचे धामधुमीमुळे मुलुखाचा सत्यानाश जहाला. रयत देशांतरास गेली. मुलखात काठवण झालें. याउपरि साहेबी मोंगलाचा तह केला. ते प्रसंगी प्रांत मजकूर स्वराज्यात घेतला. मुलूख महामूर करावयासी आज्ञा केली. तरी सात साला इस्ताव लागले ढेपेस उगवणी असा कौल दिल्हा. रयत देशांतरास गेली तेथे कौल पाठवून रयत आणवून गावांवर वसाहत करूं ह्मणून अर्ज केला. बराय अर्ज खातरेस आणवून, महामुरीवर नजर देऊन सात साला लागले ढेपेस इस्ताव कौल दिल्हा असे. तरी तुह्मीं रयतेचा दिलदिलासा करून, मुलूख महामूर करणें आणि लागले ढेपेस सात साला तनखा उगवणें, बाबती देखील. जास्ती आकार लागणार नाहीं. अभय असें. जाणिजे. छ १७ जिल्हेज. आज्ञा प्रमाण. लेखन सीमा. सुरू रुद्र. चवथे वेळेस शिक्का.
श्री.
अजहत देशमुख बाळाजी गणेश शाहू नरपति हर्षिनिधान
धडफळे यांजवळ अस्सस असे. } बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान.