Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ तिसा अशर मया व अलफ, सन ११२८ फसली, अव्वल
साल छ ६ रजब, २५ मे १७१८,
ज्येष्ठ शुध्द ६ शके १६४०.


फेरोकशेर पातशाहास सय्यदांनी मारल्यानंतर त्याचे जाग्यावर रफीउद्दरजात या नांवाचा 
पातशाहा सन १७१९ त झाला. त्याचे कारकीर्दीत शाहूस दक्षिणेंकडील सरदेशमुखी वगैरे अमलाविषयी परवाने झाले होते; परंतु ते अमलांत न येतां, सदरहू पातशाहा क्षयरोग लागून लौकर पांच महिन्यांत मयत१२ झाला. नंतर त्याचा भाऊ रफीउद्दवला यास तख्तावर बसविला; परंतु तोहि दोन तीन महिन्यांतच मयत झाला. या कारणानें बाळाजी विश्वनाथ याचें रहाणें, सनदा वगैरे कार्याकरितां, दुसरा पातशाहा होईतोंपर्यंत दिल्लीस झालें. पुढे शहाअलम याचा नातू रोशन एकत्यार या नावांचा उभयता सय्यदांनी तख्तावर बसविला. त्याचे नांव महंमदशहा असे ठेविले. या साली दरबारांत त्या दोघा सय्यदांशिवाय काही कार्य होत नसें. त्यांचे व निजाम उन्मुलुक याचें अंतर्याम शुध्द नव्हतें. त्याशीं सख्य करण्याविषयी सय्यदांनी बराच प्रयत्न केला; परंतु तो मनापासून वश झाला नाही. कारण, त्याजकडे दक्षणचा अधिकार असतां पातशाहानें सय्यदास नेमिलें, आणि निजामुन्मुलुकास मुरादाबादेस पाठविलें. त्याणें तिकडे चांगला बंदोबस्त केल्यामुळे फेरोकशेर पातशाहानें दिल्ली बोलावल्यावरून कितेक दिवस बेरोजमारी होता. पुढे त्यास माळवे प्रांताचा अधिकार देऊन पाठविला. त्याला पुढे अधिक योग्यतेस येण्याची आशा होती; परंतु पुढे लौकरच दुसरी मुद्रा होईल, अशी अटकळ करून तो समय येण्याची वाट पहात बसला होता. पुढे शाहू महाराज यांणी करार केल्याप्रमाणें चौथाई व सरदेशमुखी व शिवाजीनें मुलूख संपादिला होता, त्याबद्दल वगैरे सनदा-पत्रें पातशाहाकडून करवून घेऊन, व फौजेचा खर्च सय्यदांकडून घेऊन, शाहू महाराज यांची मुले, माणसें दिल्लीस ओलीस ठेविली होती, ती घेऊन देशी येण्याचा विचार ठरला. पुढे निजामुन्मुलुक यांणी बाळाजी विश्वनाथ व अंबाजी त्र्यंबक यांची पातशाहापाशी तारीफ केली. पातशाहापाशी मेजवानीबद्दल द्रव्य घेऊन आपल्याबरोबर देशी औरंगाबादेस घेऊन आले. दरम्यान दिल्ली मुक्कामी सरदेशमुखी चौथाई वगैरे मुलुखाच्या सनदापत्रें शाहू महाराजास देण्याचा ठरलेला विचार दिल्ली दरबारांतील कितीक लोकांस न आवडून त्यांणी असा बेत केला की, पेशवे  दरबारांतून सनदापत्रें घेऊन निघाले ह्मणजे रस्त्यांत गाठून सनदा हिसकावून घेऊं. ही मसलत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांस समजली. तेव्हां ह्याविषयीं काय करावें, असें बाळाजी महादेव भानूंस विचारिलें असतां, त्यांणीं अशी सल्ला दिली कीं, आपण सनदा घेऊन दुसरे आडवाटेनें लष्करात गोटांत जावें, मी पेशवे या थाटानें तुचे पालखीत बसून मागून येतों. असा विचार ठरल्याप्रमाणें पेशवे सनदा घेऊन दुसरे आडवाटेने निघाले व भानू इतमामानिशी भर रस्त्याने येत असतां संकेताप्रमाणे तेथील लोकांनी गर्दी केली. तेव्हां संताजी भोसले बरोबर होते, त्यांणी बहुत पराक्रम करून त्या प्रसंगीं पार पडले. बाळाजी महादेव भानू फडणीस यास पेशवे असे समजून त्यावेळेस ठार मारिले. बाळाजी विश्वनाथ दुस-या मार्गाने गोटाकडे येतात तो इकडे असा प्रसंग झाला ! तो पाहून पातशाहा यास निरोप सांगून देशी निघाले. त्यावेळेस संताजी भोसले यांणी पराक्रम केलेला ऐकून सवाई संताजीराव असा किताब राणोजी भोसले यास देऊन फौजेतील सरदार वगैरेस पातशाहाकडून वस्त्रें मिळाली. दक्षणचे सुभ्याची सर्व काळ कुमक राखून, लिहिले जाईल तेव्हा फौज कुमकेस पाठवीत जावी; तळघाट, कोंकण व वरघाट, बालाघाट, दुतर्फादेखील बंदोबस्त किल्ले आणि सरदेशमुखी वतनी अंमल शिवाजीनीं त्याप्रमाणे सहा सुभ्यांत चालावें; व स्वराज्यांत पूर्वी शिवाजीनी अंमल बसविला त्याचे फरमान करून दिले.