Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ८.
श्री.
१६२४ वैशाख शुध्द १३. स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २८चित्रभानू संवत्सरे वैशाख शुध्द त्रयोदशी भौमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति यांनी राजश्री खंडोजी काकडे मुद्राधारी व लेखक किल्ले सुधागड यासी आज्ञा केली ऐसीजे-
मौजे खवली, ता. पाली, हा गांव कुलबाब कुलकानू राजश्री महादाजी कृष्ण यासी कैलासवासी...... स्वामींनी इनाम दिला आहे. त्याप्रमाणे करार आहे. तरी हे जाणून मौजे मजकुरास उपसर्ग येकजरा देणे. दुसरा कोण्ही उपद्रव करील त्यांसी ताकीद करून मारनिल्हकडे सुरळीत चालो देणे. निदेश समक्ष.
लेखांक ९.
श्री.
१६२४ वैशाख शु ||१३. स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २८ चित्रभानू संवत्सरे वैशाख शु|| त्रयोदशी भौमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति यांणी
मोकादमानी व रयानी मौजे खवली त|| पाली, प्रां. चेऊल
यासी दिल्हे अभयपत्र ऐसेजे- मौजे मजकूर राजश्री महादाजी कृष्ण याजकडे इनाम आहे. त्याप्रमाणे करार आहे. तर तुम्ही कोणेविसी शक न धरितां, गावांवर राहून कीर्दी मामुरी करणे. आणि गांवीचा ऐवज मारनिल्हेकडे सुरळीत देणे. दुसरे कोणाचा उपसर्ग तुम्हांस लागणार नाही. अभय. निर्देश समक्ष.