Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

त्याजवर तिसरे प्रहरी वाड्यांतून बाहेर जाऊ लागलो. तो बाळोजी शेलार, सरकारचा हुज-या, याने हांक मारून बोलला, भटा! बाहेर जाशील तर तुला सरकारची द्वाही आहे. असे बोलला. त्यासी उत्तर केले की, सरकारचा हुज-या तू, आम्हा द्वाही द्यावयाचे प्रयोजन कायॽ असे बोलतो, कचेरीत लोक ऐकताहेत, इतक्यांत दरवाज्याचे छपरांत बसला होता तेथून उठोन शिव्या देत आला. पूर्वेच्या सोप्यांत उभा होतो तेथे येऊन धक्का दिला. अंगणांत पाडावे, तो तोल खांबावर संभाळला. दुसरा धक्का देऊन खाली पाडावे तो कचेरीतून लोकांनी पाहून धावले. दहा वीस असामी येऊन, हुज-यास धक्काबुक्की देऊन खाली बसविला, त्याने दंगा बहुत केला. त्यामुळे गांवांतील गृहस्थ दहा वीस वाड्यांत मिळाले. त्यास मजकूर विचारला. आम्हांस मजकूर विचारला. उभयतांचा मजकूर विचारून, सर्वांचे ध्यानांत आले की, गंगाबाई व कारभारी मिळोन करविले. हे ध्यानांत आणून उठोन गेले. उपरांतिक अस्तमानी शंभर मनुष्य मिळऊन वाड्याभोवताली चक्की बसविली. बंदोबस्त केला जे, जोशीबाबा व त्यांचे चिरंजीव उभयतांस बाहेर जाऊं देऊं नये. आणि गंगाबाई व कारभारी मिळोन मसलत केली की, रात्रौ उभयतांस मारावे. हा मजकूर माधवराव निळकंठ यांस समजाविला. त्याने आम्हांस बोलावून सांगितले जे, मातुश्री गंगाबाई व कारभारी मिळोन मसलत केली, तुम्हांस उभयतांस जिवे मारावे असा मजकूर आहे, पुढे कसे करावेॽ असे बोलले. तेव्हा त्यास आम्ही निषेध केला जे, अशी गोष्ट घडणार नाही, ब्राह्मणाचे राज्य आहे, यवनी नाही. असे बोललो. परंतु त्यांनी खचित सांगितले, तुम्ही कसेही म्हणा, परंतु निश्र्चयपूर्वक दगा करितात. इतके बोलोन गेले. त्याजवर आम्हांस न कळता, आमचे चिरंजिवास एक घटका रात्री माधवराव यांनी बाहेर काढून दिले आणि सांगितले जे, गांवांत राहूं नको, जिथे जीव वांचेल तिथे जा. याप्रो || सांगोन बाहेर काढून दिल्हा. हे आपणास ठाऊक नाही. त्याजवर प्रहर रात्री पंक्तीस भोजनास बसलो. मूल पंक्तीत नाही. यजमानास विचारले. त्यांनी सांगितले की, तुम्हावर दगा होणार यास्तव बाहेर लावून दिला. तुम्हाकर्ता आपली खासगी मनुष्ये घेऊन जागत बसतो. इतके हळूच सांगितले. त्याजवर आमचा बिछाना आपले पलंगाशेजारी घालून, दहा पांच माणसे जवळ बसवून, तीन प्रहरपर्यंत जागले. तेव्हा आम्ही सांगितले, रात्र बहुत जाहाली, आतां आपण निद्रा करावी. आपण कल्पना बोललां त्याचा मार दिसत नाही, स्वस्थ निद्रा करावी.