Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १.
(१ चासकरांचा मूळपुरुष महादजी कृष्ण, यास दोन बायका. पहिल्या बायकोच्या पोटचा बाळाजी महादेव व दुस-या बायकोच्या पोटचे रामचंद्र महादेव व कृष्णराव महादेव बाळाजी महादेव याचे वंशज मेघःश्यामपंत. कृष्णराव महादेव याचा वंश त्याच्या स्त्रीने दत्तक घेऊन चालविला. सरंजाम, दौलत वगैरे कृष्णराव महादेव याने मिळविली. तिजवर बाळाजी महादेव याचा हक्क नाही. असे असतां, बाळाजी महादेव याचा वंशज मेघःश्याम हा कृष्णराव महादेवाच्या दत्तकाशी दौलतीविषयी वाद सांगू लागला. तो वाद पेशव्यांनी रामशास्त्र्यांकडे नेमला. तत्संबंधाची पुढील हकीकत आहे. खटला जहागीरदाराचा पडल्यामुळे व जहागीरदार पेशव्यांचे आप्तविषयी असल्यामुळे किंचित नाजूक परंतु महत्वाचा आहे. रामशास्त्र्यांचा न्यायीपणा निःस्पृहपणा कोणत्या प्रकारचा होता, ते पुढील तपशीलवार हकीकतीवरून कळणार आहे. मूळ कागद चास येथे रावसाहेब चासकर यांच्या दफ्तरांत आहेत.)


लेखांक १.
यादी, मुक्काम पुणे, वि| हरि सिध्देश्र्वर इ||शके १७०१ विकारीनाम संवत्सरे माहे पौष मास-
अधिक श्रावणमासी सरकारांत श्रीमंतांस विनंति मेघःश्याम बल्लळ यांनी केली की, मातुश्री रखमाबाई यांजकजडून इनामांचे वगैरे आमचे वांटे कसे जाले, त्याचे मनास आणावे. त्याजवर सरकारांतून पत्र पाठविले की, तुमचे व मेघःश्याम बल्लाळ यांचे कैसे आहे ते कागदपत्र घेऊन वेदशास्त्रसंपन्न राजश्री शास्त्रीबाबांकडे समजावणे. त्याजवर महादाजी अनंत यांणी चासेस गमन केले. मातुश्रीमनी उत्तर केले की, सरकारांत व शास्त्रीबाबांस विनंति करणे की, पूर्वापासून आमचा व कोण्हाचा चालण्याविशी वगैरे लढा नाही. आपल्यास गैरवाका समजावून पत्रे घेतली आणि माणसे पत्रे आणण्याकरितां पाठविली, त्यास पत्रे आहेत ती आज नवी नाहीत, पूर्वीच कैलासवासी राव यांची व महाराज यांची आहेत, आपल्या दृष्टीसही पडतील. येणेप्रमाणे महादाजी अनंत यांणी सरकारात विनंति केली; परंतु पत्रे आहेत ती पाहिली पाहिजेत, म्हणोन आज्ञा. त्याजवर पौष शुध्द १ प्रतिपदेस हरि सिध्देश्र्वर यांजसमागमे इनामपत्रांच्या नकला करून पाठविल्या. त्या श्रीमंत नानांस मात्र दाखवाव्या. जे होणे आहे ते महाराज व कैलासवासी राव यांचे आहे त्याप्रमाणे चालत आहे. त्यास सरकारांत वेगळे वाटेने गांठ पडून पत्रे कोणाचे हाते न दाखवावी. त्यास राजश्री परशराम रामचंद्र मिरजकर लष्करात होते, त्यांजला व त्याचे कारकून शिवाजीपंत यांस वर्तमान समजाविले की, मातुश्रीची आज्ञा तुम्ही समजून एक वेळ या, नानांस एकांती समजवावे, आम्हास कोणासी वाद सांगावयाचा नाही, जे चालविले आहे व दिल्हे आहे ते श्रीमंतांनी दिल्ह आहे, आजपावेतो कोणासी कटकट केली नाह आणि पुढेही कटकट करावयाची नाही, त्यास पत्रे पाहून जे सरकारचे आहे. त्याजवर सदर मशारनिल्हेनी अवकाश करून वर्तमान नानांचे कानावर घातले की, त्यासी आजपावेतो कलह नसता हाली पत्रे आपण आणविली आहेत ती आम्ही पाहिली, आपणही पहावी. त्याजवर दोन पत्रे पाहिली आणि सांगितले की, आम्हांस फावत नाही. पहिल्यापासून संबंध नाही, परंतु उगाच चार वेळ येऊन म्हणतो की पत्रे आणून पहावी, त्यास चिंता काय, आजपावेतो कांही वाद नाही, हाली आम्हास पत्रे पहाण्यासी अवकाश नाही, त्याअर्थी वेदशास्त्रसंपन्न रा | शास्त्रीबाबास दाखवावी, म्हणजे चार वेळ येऊन बोभाट करणार नाही. ऐसे माघमासी सांगितले. त्याजवर शास्त्रीबाबांनी महादजी अनंत यांजकडे एकदोनदां सांगितले की पत्रे आणून दाखवणे आणि वाद सांगणे. त्यास, विनंति म|| रनिल्हेनी केली की, आपण म्हणता त्यास आम्हास मातुश्रींनी आपल्यास विनंति करा, आजपावेतो आम्ही कोणासी वाद सांगितला नाही आणि पुढेही सांगणार नाही. आपला आग्रह की पत्रे पहावी, त्यासी आमचे घरी पुरुष होते ते समई या गोष्टीचे कांही निघाले नाही. हाली कारभारी माहीतगार जुना कोणी राहिला नाही, म्हणोन कारभारी देऊन पत्रे सरकारांत दाखवावी, आज्ञा करतील त्याप्रमाणे वर्तणूक करावी. त्यास सरकारांत पहावयासी न फावले, आपल्यास पत्रे दाखवावी म्हणून सांगितले. पंचाईत आमची सांगावयाची नाही. त्याजवर शास्त्रीबाबांनी आज्ञा केली की, आम्हांकडे मनास आणावयासी सांगितले आहे, सरकारांत विनंति करून मना करवणे. त्यास महादाजी अनंत यांणी उत्तर केले की, आपली मर्जी आम्हांस मान्य आहे, मातुश्रीस लेहून पत्रे आपणास दाखवितो, आपण थोर आहेत, आपण जे करतील ते उत्तम करतील, आम्हांस वाद सांगावयाचा नाही. त्याजवर आज्ञा केली की, वाद सांगणे नसो; परंतु पत्रांतील भावगर्भ समजला पाहिजे, पत्रे आणून दाखवावी. ऐसा करार केला, फाल्गुन शुध्द ५ पंचमीस.