Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १०.
श्री.

१६२६ माघ शु||१. स्तस्तिश्री राज्याभिषेक शके ३१ तारणनाम संवत्सरे माघ शुध्द प्रतिपदा रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति यांणी राजमान्य राजश्री कान्होजी आंगरे नामजाद सरसुभा अरमार यांसी आज्ञा केली ऐसीजे- मौजे खवली, त||पाली, हा गांव राजश्री महादाजी कृष्ण यास इनाम आहे. त्यास तुम्ही आपल्याकडून उपसर्ग लागो न देणे. जाणिजे. बहुत काय लिहिणेॽ निदेश समक्ष.


लेखांक ११.
श्री.

राजा शाहू नरपती हर्षनिधान बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान
१६४० कार्तिक वद्य १. आज्ञापत्र समस्त राजकार्य धुरंधर विश्र्वासनिधि राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान, त|| मोकदम मौजे कसबे घोडे, प्रा. जुन्नर. सहुरसन समान अशर अलफ. क|| मार रा महादाजी कृष्ण याकडे मोकासा दिला आहे. तेणेप्रमाणे करार आहे. तरी क|| मारी बाकोजी ढमढेरे याची दखलगिरी होऊ न देणे. ऐवज रा महादाजी कृष्ण याकडे सुरळीतपणे वसूल देणे. कथळा कुसूर न करणे. जाणिजे. छ १४ जिल्हेज. आज्ञाप्रमाण.