Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक १२
श्री.
१६४८ आश्र्विन वद्य १. राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामचंद्र महादेव स्वामी गोसावी यांसी-
पो बाजीराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. तुम्हाजवळून कर्ज घेतले रु २०००० वीस हजार रु घेतले. यासी व्याज दरमाहे दर से || रु दोन प्रमाणे केले असे. झाले मुदतीचे व्याज व मुद्दल ऐसे देऊ. शके १६४८ पराभव नाम संवत्सरे आश्र्विन वद्य प्रतिपदा भृगुवासरे, छ १४ सफर सु|| सवा अशरीन मया व अलफ. बहुत काय लिहिणेॽ लोभ असो दीजे, हे विनंति.
लेखांक १३
श्री.
१६४९ मार्गशीर्ष वद्य १३. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री कृष्णाजी महादेव स्वामी गोसावी यांसी-
सेवक चिमणाजी बल्लाळ नमस्कार. सुहूरसन समान अशरीन मया व अलफ. तुम्हापासून कर्ज मुद्दल घेतले रुपये २५०० अडीच हजार, यासी व्याज दरमाहे दर से|| रु १ येकप्रमाणे जाले मुदतीचे व्याज व मुद्दल देऊ. जाणिजे. छ २६ रविलाखर, मार्गशीर्ष बहुल त्रयोदसी, सौम्यवासरे * चो महिन्यांनी मुद्दल व व्याज देऊ. बहुत काय लिहिणेॽ हे विनंति.