Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

१ आषाढ शु || ५ पंचमीस वेदशास्त्रसंपन्न शास्त्रीबाबा श्रीओंकारेश्र्वराचे देवळी देवावर पाणी घालून, देवास कोंडून, अनुष्ठानप्रतीक्षा करू लागले. तेथे वे || रा केसोभटजी शु || ६ चे दिवसा गेले. त्यास शास्त्रीबाबाजवळ बसले. त्यास बाबांनी पुशिले की, आपण समस्त ब्राह्मणांस आज्ञा केली, हे कार्य सर्वांचे आहे. आम्ही व ते येऊ. त्यास बाबांनी सांगितले की, तुम्ही न यावे, शरीरी समाधान वाटत नाही, येथे बसवणार नाही. ऐसे सांगितले. उत्तम आहे, म्हणून घरास येऊ लागले. त्यास पंचाइतीचा कारभार रा त्रिंबकपंत देवळी करीत बसले होते. तेथे हरि सिध्देश्र्वर होते. त्यांणी भटजीस व शास्त्रीबाबांस नमस्कार केला. तेव्हा शास्त्रीबाबा भटजीस बोलले की, आम्हांस स्मरण आहे, मुचलका लिहून घेऊ. नंतर तुम्हांसी बोलू ऐसे सांगितले.

आषाढ शुध्द १२ द्वादशीस रा त्रिंबकपंताकडे गेलो. तेथे त्यांणी सांगितले की, तुम्हांकडील वर्तमान लिहिले आहे, ते मेघःश्यामपंतास पुशिले, त्यांणी उत्तरे बहुत केली की, जे आहे ते माझे आहे, दौलत, नांवलौकिक रामचंद्र महादेव, कृष्णराव यांणी मेळविले नाही, चित्तास येईल तैसा खर्चवेच मात्र केला, मोगलाईत घोडी रामचंद्रपंतांची घेऊन गेले, लोहगडीची दौलत चासेस भरून नेली, नारो रामचंद्र यांसही वाटा दिला नाही. जबरदस्तीच केली, पुढे रामचंद्र कृष्णराव यास देवाज्ञा जाली, दत्तपुत्रही घेतला नाही, पुढे मातुश्रीमार्गे सर्व माझेच आहे, तुम्ही दत्तपुत्र घेतला म्हणता, तरी मी द्वाही दिल्ही आहे, आणिखी कितेक गोष्टी आहेत, त्या ख-या करून देईन. ऐसे बहुत बोलले. दम भारी आहे. त्यास आम्ही उत्तर केले की, आपले घरी बोलले, हे बोलणे शास्त्रीबाबांजवळ बोलावे उणे अधिक बोलावयाचे प्रयोजन नाही, आपल्या आपल्यांत त्यांणी बोलावे, आम्हीही उत्तरे करू, तेव्हा खरोखर कलागत व्हावी यांत काय आहे, त्यांसच बोलता येते आम्हांस येत नाही की कायॽ जे बोलणे ते समक्ष विनंति करू, मागे जबरदस्ती चालली म्हणून दौलत नेली, दत्तपुत्रही घेतला, त्यास श्रीमंत तेव्हाही होते, आणि हालीही आहेत, आमची जबरदस्ती मागे चालली आणि पुढे का न चाले, मागलेच श्रीमंताचा वंश हे श्रीमंत आहेत, आमचेच आहेत, श्रीमंतांनीच चालविले, तेव्हा कोण घेणार, त्यास श्रीमंतांचे मर्जीस आले तरी सर्वस्वे श्रीमंतांचे आहे, यांत दाईजांचे काय आहे, असो. आम्ही कारकून समक्षच जे बोलणे ते बोलू. अपरोक्ष कोणीही उणे अधिक बोलू नये, याउपरि बोलल्यास आम्ही मर्यादा राखणार नाही, येविषयी शास्त्रीबाबांस विनंति करितो. त्याजवर वे || रा केसो भटजीस सविस्तर वर्तमान सांगून श्रीओंकारेश्र्वराचे देवळी त्रयोदशीचे दिवसी देवदर्शनास भटजी गेले, म्हणून कळले. तो आम्हीही गेलो. तेथे रा सदाशिव दीक्षित दाते बाबांजवळ बसले होते. तेथे भटजीही होते. आणखी कामे होती ती बोलले. नंतर आम्ही जाऊन नमस्कार केला. तेव्हा भटजींनी बाबास वर्तमान सांगितले की, आपल्याजवळ ठरले आहे की, मुचलके घ्यावे, नंतर काय बोलणे ते बोलावे, मध्ये रा त्रिंबकपंताचे घरी मेघःश्यामपंत जाऊन उणे अधिक बोलणे चित्तास येईल ते बोलतात, म्हणून चासकरांचे कारकुनांनी आम्हांजवळ सांगितले की, त्रिंबकपंताजवळ बोलले ते बोलणे त्यांणी आम्हांजवळ सांगितले, त्यास उणे अधिक बोलण्याचे प्रयोजन काय आहे, आम्ही बोलू तेव्हा कठिण पडेल, यास्तव आपण शब्द ठेवितील. त्यास बाबा बोलले की, त्या समई म्हणावे की, प्राण जाऊ लागतो ते समई माणूस वायचळते तैसे त्यास जाले आहे, आम्हांकडेही देवळी बसल्यापासून आला नाही, मुचलका घेतल्याशिवाय राहत नाही, ताकीद करतो. ऐसे बोलले. तेव्हा दीक्षितही बोलले की, बाबा, यांचा त्यांचा संबंध काही पूर्वीपासून नाही, आम्हांस आमचे तीर्थरूपांनी सांगितले आहे. त्याजवर उभयतां घरास आले.