(३) तु + वयम् = सु + वयम् = हु + वयम् = यु + वयम् = युवयम् = यूयम्
तु + अस्मह् = युष्मह्
तु + अस्मा = युष्मा, युष्माँ
तु + अस्म = युष्म
तु + अस्मे = युष्मे, त्वस्मे
* प्राकृत तुम्हे व तुज्झे ही रूपे त्वस्मे चे अपभ्रंश आहेत.
(४) तु + माम् = तुमाम्, त्वाम्
तु + मा = त्वा
* प्राकृत तुम्, तुमम् हीं रूपे त्वाम्, तुमाम् या रूपांचे अपभ्रंश आहेत.
(५) तु + आवाम् = युवावाम् = युवाम्, वाम्
(६) तु + अस्मान् = युष्मान्
तु + अस्मह् = यु + अहम् = वहम् = वह् = व:
तु + अस्मे = त्वस्मे
* प्राकृत वो, तुम्हे व तुज्झे ही रूपे व: व त्वस्मे या रूपांचे अपभ्रंश आहेत.
(७) तु + मया = त्वया
तु + मया = तुमया
तु + मये = तुमये
* प्राकृत ते, तइ , तए, तुमए, तुमे, तुमाइ, दे, ही रूपे त्वया, तुमया व तुमयै या रूपांचे अपभ्रंश आहेत.
(८) तु + आवाभ्याम् = युवाभ्याम्
तु + आवाम् = युवाम् = वाम्
(९) तु + अस्माभि: =युष्माभि:
तु + अस्मेभि: = त्वस्मेभि:
* प्राकृत तुम्हेहि, तुज्झेहि ही रूपे त्वस्मेभि: चे अपभ्रंश आहेत.
(१०) तु + मे = त्वे = ते
तु + मभ्यम् = त्वभ्यम् = तुभ्यम् तुह्यम्
* मराठी चतुर्थी एकवचनाची मज व तुज ही रूपे वैदिक व पूर्ववैदिक मह्यम् व तुह्यम् या रूपापासून आलेली आहेत. माझे असे ठाम मत झाले आहे की प्राकृतात चतुर्थी नाही असे जे प्राकृत वैय्याकरण म्हणतात ते वस्तुस्थितीला सोडून आहे. प्राकृतात षष्ठींची व चतुर्थीची रूपे अपभ्रंश होऊन एकसारखी दिसतात त्यामुळे प्राकृतात चतुर्थी नाही असे त्या वैय्यकरणांनी म्हटले. षष्ठीं नाही, फक्त प्राकृतात चतुर्थी आहे असे म्हटले असते तरी चालले असते. मग चतुर्थीचे काम षष्ठी करते असे न म्हणता, षष्ठीचे काम चतुर्थी करते असे म्हणावे लागले असते इतकेच.