मानाजी बळवंतराव देवकांते लेखांक १७२. १७१५ चैत्र वद्य २.
यांचे पत्राचें उत्तर.
राजश्री मानाजी बळवंतराव देवकांते गोसावी यास- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें पा वसमत पो ठाण्याचे गांवास रोशनखान व रंगराव यांचा उपसर्ग लागतो सबब उभयतास तुमचे लिहिल्याअन्वयें पत्रें लेहून पा आहेत देऊन बंदोबस्त करून घ्यावा पा तामसें एथील मोकाशाचे फडच्याविषई महमद दौलतखान यांस पत्र लिहून रवाना केले आहे त्यास देऊन मामलतीचा फडच्या ई।। राहिल्या सालापासोन करून घ्यावा तुह्मी ह्मैस पा ते पावली रा छ १६ साबान बहुत काय लिहिणे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)