लेखांक २३५
जवाब आनंदगीर बावा गोसावी साहेब सलामत
.ll मोहीदानपन्हाई मुखलिसान दस्तगाही अजी बुर्हानखान सेखदार सलाम बादज सलाम येथील खैरसला जाणोन तुह्मी आपली खैरसला दरवखत लिहीत जाणे गावास तुह्मास साहेबी कौल दिल्हा त्याप्रमाणे तुह्मी झाडा केला त्यावरी देसमुख देसपाडे याणी आणीख रु॥ ५० घातले ऐसीयास आह्मी साहेबासी रदबदली बहुत केली आणि रु॥ २० आणीख करार केले बाकी रु॥ ३० तुह्मास सोडविले आह्मास ऐसे जाले की इकडे साहेब राखावा इकडे यास राखावे इकडे तुह्मास राखावे ऐसे जाले ह्मणौन ऐसा करार केला की आता तुह्मी मागे दिल्हे समेत करोड रु॥ २५ दिल्हे व हाली रु॥ २० ऐसे रु॥ ४५ जाले इतक्यावरी हे साल वारले आता पुढे पुढले सालास तुह्मी येथे येणे आणि हजरती साहेबाची भेटी घेऊन आपला खड करून जाणे मालूम होय (फारसी शिक्का)