लेखांक ३३३
१५५९ आश्विन शुध्द ८
फर्मान हुमायून शरफ सुदुर्याफत बजानेब कारकुनानी किले रोहिडा की अज सु॥ समान सलासीन अलफ दरीविला बदरगाह वालाज्याह रोशन गरदीद के कान्होजी जेधा देसाई तरफ भोर किले मजकूर मशकत कराव्या कतसीर केली नाही व पुडासी दफे केले त्यावरून अजरामराहीम पादशाहाना व फरत अवातीफ खुशरवाना मौजे तिचखलगाऊ तपे मजकूर दरवझ इनाम कान्होजी देसाई मजकूर मराहमत फर्मान देविले असे मेबायद के देहमजकूर मालूम बाद व कुल उलीह्मात दुबाला करणे बाद ऊ अवलाद व अहफाद त्यासी रवा करणे तालिक लेहून घेऊन असल फर्मान फिराऊन देणे बरहुकूम दुबाला करणे तेरीख ६ जमादिलोवल
परवाना हुजुरु अशरफ अकदस हुमान आला बा एकलासखान अलीशान सादतशान रफिअकदर बदमकान एखलासखान वजीर हुकुमत