लेखांक ३३६
श्री
सौजन्य राजमान्य राजश्री कानोजी नाईक देसमुख तपे भोर किले रोहिडा गोसावियासि त्रिंबक कान्हो हवालदार पा। वाई हर्ची दाद उपरि हजरत खान अजम साहेबाचा कौल पाठविला असे तरी तुह्मी कोणे बाबे मुलाहिजा न करिता कागद देखता च बहुत सिताबीने स्वार होऊन जमेत घेऊन एणे हे मसलत तुह्मी फते केलिया तुमचे सरफराजी असे ए विसी पहिले हि तुह्मास कागद लिहिला असे त्यावरून कळो आले असेल बहुत सिताबीने स्वार होऊन एणे एथे माणसाचे खर्चाचे हि सरजामी होईल मर्दाने खलक घेऊन एणे आह्मी तायघाटाहून हि पुढे स्वार होऊन गेलो असो बहुत सिताबीने एणे हे कि। छ ३ रजबु रोटी आह्मापासी आहे ते ऐथे आलियावरी देऊन हे कि॥