श्री.
श्रावण व. २ शुक्रवार शके, १७१५.
विनंति विज्ञापना. औरंगाबाद येथील तमाम साहुकारासे पटी आंठीघ।। चा कर लाख रुपयांचा तेथील सुभे ईफ्तखारखान व मिरधे मुरादबक्ष यांणीं नवाबाचे हुकुमा बमोजीब केली. त्याची हिसेरसीद हरबाजी नाईक बिडवई याचा पुतण्या रघुनाथ नाईक याजवर साडेबारा हजार रुपयांची ठरली. पटी रुपयांचा तगादा सुभे व मिर्ध्याकडील; सबब, रघुनाथ नाईक यांनीं शहरांतील येक कलाल रुस्तुम ह्मणोन व आणिक कांहीं साहुंकार वगैरे लोकांचा येका करून पांचसातसेपंर्यंत जमियेत ही ठेविली; त्यांस रोजमुरा वांटुन सुभे व मिरधे यांस मारावयाची तजवीज केली. हें वर्तमान सुभ्यास समजतांच त्यांणीं तमाम साहुकार लोक रघुनाथ नाईक सुधां धरून आणून चौकसी केली; सर्वांचे संमतें या करण्याचे बाजीकार रघुनाथ बिडवई व रुस्तुम कलाल, त्यावरून सुभे व मिरधे यांणीं रघुनाथ नाईक यांचे पांई बेडी घालून कैद केलें. दुकान घरदाराची जप्ती केली. कलालास तोफेचे तोंडी देऊन उडविलें. याप्रो औरंगाबादेहून अखबार छ, २६ जिल्हेजी नवाबाकडे आली. बिडवई याचा दुकान येक औरंगाबादेस तो तेथें जप्त झाला. हैदराबादेंतील दुकानाचीही जप्ती करविली. रघुनाथ नाईक याचा मामा त्रिंबक नाईक येथें बेदरास स्वारीसमागमें आला. येथीलही दुकानावर पाहरे रात्रींच पाठवून जप्ती जाली, बहुत लोकांच्या ठेवी त्याचे दुकानीं फार दिवसांपासोन, त्यासुधा येकवार चीजबस्त कुल जप्तींत आले. सुभे यांणीं औरंगाबादी रघुनाथ नाइका पासोन गुन्हेगारीची नजर साडेबारा लाख रुपयांची फर्द मारहाण देऊन लेहून घेतले. सांप्रत दुकानांतील वह्या सरकारांत आणऊन ई॥ पासोनं कोणाचा यैवज किती जमा याची चौकसी होत आहे इतकियावर काय होतें हें। पाहावें र छ, १५ मोहरम हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)