मलाजन - मल्ल ( लोकनाम ) - मल्लकजनं. खा म
मलाणें - मल्ल (लोकनाम ) - मल्लवनं. ,,
मलोणी - मल्ल (लोकनाम) - मल्लवनी. ,,
मल्याडदेश - मलयाद्रिदेशः = मल्याडिदेश = मल्याडदेश = मल्याळदेश.
मल्याणें - मलय (पर्वत देशनाम ) - मलयवन. खा म
मवला - मयु ( किन्नर) - मयुपल्लः. खा व
मसकावद - माशक - मशकावर्त. ३ खा इ
महंकाळें - मयंक ( चंद्र) - मयंकतलं. खा म
महड - महत् - महाहाटं. खा नि
महमदपुर - २ खा मु
महलकडू - मधूलिका - मधूलकद्रु. खा व
महलखेडी - मधूलिका. खा व
महागण - महा (गाय) - महांगण. खा इ
महागांव - महाग्राम ( महा म्हणजे गाय). मा
महाड - मह + आड = महाड = मोठ्या बाजाराचें गांव. (ग्रंथमाला)
महाबळेश्वर - सह्याद्रीच्या ज्या खोर्यांना सध्यां आपण मावळें म्हणतों त्यांना हजारबाराशें वर्षांपूर्वी मामल ही संज्ञा असे. ह्या मामलदेशांतील जी मुख्य देवता ही मामलेश्वर अथवा मामलेसर. महाबळेश्वराच्या भोंवतालील खेड्यांतील लोक महाबळेश्वराला मामलेसरच म्हणतात. मामलेसराला महाबळेश्वर हें नांव शास्त्रीपंडितांनीं आपल्या संस्कृत वाणीला साजेल असें दिलें आहे. (महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)
महालक्ष्मी - महालक्ष्मि. खा म
महिंदळे - महीन्द्र (देव) - महीन्द्रपल्लं. २ ,,
महीर - मिहिर (सूर्य) - मिहिरकं. ,,
महुखेडें - मधु, मधुद्रुम, मधूक. खा व
महुडें - सं. प्रा. महाकूट, पुणें, रत्नागिरी. ( शि. ता. )
महुडोल - मधुद्रुपल्लं. खा व
महुनी - मधुधुनी. खा न
महुपुर - मधूकपुरं. खा व
महुमाडल - मधु, मधुद्रुम, मधूक-माडल ? खा व
महुरवाडी - मधुकर वाटिका. खा इ
मळखेडें - मल्ल (लोकनाम) - मल्लखेटं. खा म
मळगांव - मल्ल (लोकनाम) - मल्लग्रामं. ,,
मळवली - मल्लपल्ली (माळावरील गांव). मा