लेखांक १७८ श्री १६१५ चैत्र शुध्द ६
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके १९ श्रीमुख नाम संवछरे चैत्र शुध शष्टि मंदवासरे क्षेत्रियकुलावतंश श्रीराजारामछत्रपती याणि राजमान्य राजश्री तुलजी जाधव वजारतमाब यासि आज्ञा केली ऐसी जे तुमचे विशी राजश्री धनाजी जाधवराऊ यांनी चंजीचे मुकामी विनंति केली की मा। तुलाजी जाधव यास सिलेदाराची पंचसहश्रीची सेवा आहे देशीहून कर्नाटकात जमाव घेऊन आपणांबराबरी एऊन सेवा एकनिष्टपणे करीत आहे तरी यास भाग्य देविले पाहिजे ह्मणऊन श्रुत केले त्यावरून तुह्मी स्वामिकार्याचे मर्दाने व सेवा हि एकनिष्टपणे करीत आहा तुमचे ऊर्जित करणे स्वामीस अगत्य यास्तव स्वामी तुह्मांवरी दयाळू होऊन तुह्मास भाग्य पा। होनु १००००० एक लक्षा होनाचे दिल्हे असे तरी धड घोडें व धड माणूस जमाव करून स्वामिसेवा इमाने इतबारे करीत जाणे यास खासा जातीस व जमेत चालवावयाची मोईन बिता।
खासा जातीस पा। होनु श्वार ३०० आ। रास ६०० यासि
१०००० ऐन रास मजुरादास्त
५७३ २५ हत्तीस व हत्तिणीस
चालवा- वेयास ५
२ उंटावरील दमामा
-----
२७
यासि दर सदे पंधरा हजारी प्रमाणे
९००००
एकून पातशाही एक लक्ष होनाची दौलत दिल्ही असे इ॥ सनद पा। पासून खासा जातीस व श्वार जे जे तेरिखेस बिलामोहला नावनिसीवार गणती देऊन हजिरी लेहवाल त्या त्या दिवसापासून दरबारदंडकाप्रमाणे वजावाटाऊ करून उरली बेरीज तुमच्या जमावामाफीक खासा जातीस व जमेतीस होईल ते पावेल जमाव करून राजश्री धनाजी जाधवराऊ याचे ताबीन राहून इमानेइतबारे स्वामिसेवा करीत जाऊन एकनिष्ट वर्तणे जाणिजे बहुत काय लिहिणे
रा। छ ९ रमजान
तेरीख ४ शाबान माहे साबान
सु। सलास तिसैन
बार सूद
संमत सुरू सूद बार