श्री.
ज्येष्ठ व. ३ बुधवार शके १७१५.
छ. १६ रोज रवाना टपा.
राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेसी----
विनंति उपरि. जफरुदौलायहतेषामजंग यांचे बोलणें कीं “माझे बापापासून श्रीमंताचे दौलतखा तुमचे दोस्तीचा सीलसिलांही कदीमपासून असें असतां माझे कामावर आपण कांहींच मुतवले होत नाहीं. हें अपूर्व आहे ! पानगलचे मुकामीं मध्यस्त आल जपूरचें काम मजकडे सांगत होते ते वेळेस आपण खातर केली असती तर माझें काम होतें. श्रीमंताचे दौलतखाह तुमची दोस्ती कधीं कधीं उपयोगीं पडावी " इत्यादिक बहुत गिला केला. त्याचें उत्तर त्यांस दिल्हें कीं " तुह्मीं ज्या गोष्टी बोलिलां त्या ख-या. परंतु इतके दिवस या विषईचा तुह्मांस खियालच नाहीं. जर खियाल असता तर आजपरायेंत स्वस्थ का बसलां? तुमचे बाप सरकारचे दौलतखा हें समजोन निर्मळचे मोहिमेचे वेळेस मदारुल माहम यांनीं तुह्मांविषई आमचे बरोबर नवाबास कित्येक गोष्टी सांगून पाठविल्या. तेव्हां हजरतीनीं मान्य करून आह्मांस सांगितलें. त्याजवरून ज्यांत तुमचें स्वैरखाहीची गोष्ट ती सांगून पाठविली. हजरितींनी ही मान्य करून लढाई मोकूफ करून तुह्मांकडीलजबाब सवालाचे इंतज्यारींत होते. सेवटीं तुमचे असंमजसपणाचें बोलणें पडलें; तेव्हां आह्मी लाचार होऊन निरोप घेऊन पुण्यास गेलों. सेवटीं जें व्हावयाचें तें झालें. आह्मी बोलत होतों त्याचे शतांश तरी तुम्हांस कांहीं लाभ जाहला ? कांहींच नाहीं ! त्याजवरून आमचे मनांत निश्चये कीं अद्याप दुनयायीचे उंच नीच गोष्टींविसीं प्रवीणता नाहीं. आणि तुमचे बापाची काय माई याची ही माहितगारी नाही. तेव्हां तुमचा विश्वास खातरजमा कोण त-हेचा कसा मानावा? याजकरितां या गोष्टीचा गिला आह्माकडे नाहीं. तुह्मी हुषीयार जालीयावर पुढें तुह्मासच बरें वाईट कोणतें हें समजत जाईल," ऐशा कितेक गोष्टी सांगितल्यावर सावध होऊन बोलिले कीं “जें मागें जालें तें गुदस्ता आतां मदारुल माहम यास माझी पास असावी. माझे दौलतरवाहीचा सिलसिला कायम करावा. मदारुलमाहम व हरिपंतजी यांस पत्रें लिहून देतों हीं पाठवावीं. माझे कार्याविषयीं तुह्मी मध्यस्तापासीं सई करावी. मदारुलमाहम यांचे लक्षाखेरीज मी नाहीं. याची खातरजमा जसी पाहिजे तसी करून देईन. त्यांत आंतर पडावयाचें नाहीं " म्हणोन बहुमताप्रकारें बोलिलें, त्यावरून त्याची खातरजमा केली. “मदारुल माहम यासही लिहितों. उत्तर येईल. नंतर तिकडील खातरजमेचा प्रकार तुमची बोलण्यांत येईल. '' याप्र।। बोलण्यांत आलें, आस्थाही लावून ठेविली आहे. हा मजकूर राजश्री नानास श्रुत करावा. र॥ छ. १६ जिल्काद. हे. विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)