त्यावरून असीनखानाने आमचे कबीले व आह्मास धरून न्यावे ऐसा तह केला ते खबर आह्मी ऐकिली इतके करून धीर धरून होतो तो महादजी जगदळे यानी शामभाऊ सेखदार मसूरी होता त्यासी रदबदल करून अमानत मोडिले होळीचीपोळी तिमाजीचे हवाला केली ऐसी जारावरी जाल्यावरी आपण गावाबाहीर पडिलो त्यावरी गाव लागेनासा जाला मग सटवोजी व तिमाजी आईसाहेबाकडील अतोजी डावरा ऐसे मिळून माधवरायाकडे गेले त्यास गाविचे वर्तमान सागितले गाव आईसाहेबाचा आहे गाव पडिला तरी नाईकजीस व भागोजी पाटिल बोलाऊन आणून त्याची सटवोजीची समजावीस करून देणे त्यावरून रायानी बोलाऊ पाठविले मग आह्मी गेलो रायाची भेटी घेतली त्यानी आह्मास हकीकत विचारली आमची हकीकत होती ते आह्मी जाहीर केली अमानत दिवाणात जाऊन मोडिले आह्मास दिवाण मोगली भेटावयास नये चार तुफाने केली त्याकरिता तिमाजी जाऊन दिवाणात लाच लुसबत देऊन अमानत मोडिले याकरिता आह्मी गावाबाहीर पडिलो ऐसी हकीकत रायास विदित केली त्यावरून रायानी सटवोजीस व तिमाजीस पुसिले जे तुमचा याचा कज्या असता अमानत मोडिले हे तुह्मास बरे नव्हे त्यावरी सटवोजी व तिमाजी बोलिला जे अमानत कोणीही केले नाही त्यावरून आपण जाब दिल्हा जे तळबीडचे पाटील जानोजी मोहीते व भानजी गोपाळ सुभेदार व मोरो उधव यानी अमानत केले आहे यास सडी पाठविणे त्याचे उत्तर आल्यावरी आह्मी ह्मणतो हे खरे की लटके मग रायानी कागद देऊन त्याला व आह्माला तळबिडास मोझ्यास पाठविले तळबिडिहून गोताचे कागद तिमाजीस व सटवोजीस आणिला जे तुह्मी उभयतानी गाव लावावा हक लाजीमा होली पोही अमानत देवापासी ठेविली इतके न करिता तुह्मी अमानत मोडिले हे उचित केले नाही ऐसा कागद तिमाजीस आणून दिल्हा मग तो कागद रायानी पाहिला रुजू मोकाबिला आला मग रायानी जे सटवोजीस व तिमाजीस विचारले जे याची वाट काय करिता त्यास त्यानी उत्तर दिल्हे जे पुर्वी अमानत चालत आले आहे त्याप्रमाणे पुढे ही चालवावे आणि आमच्या भावास समजाऊन गावास लाऊन द्यावे ते व आह्मी एक मते राहून ऐसे बोलिले त्यावरी रायानी अमानत ठेऊन थलास लाऊन दिल्हे थलास रजावद आहा की नाही ऐसे आह्मास व त्यास विचारले त्यानी सटवोजीने व तिमाजीने रजावद होऊन राजीनामा लेहून दिल्हा व आह्मी राजी होऊन राजीनामा लेहून दिले हर्दू जणापासी जमान घेऊन सोमयाच्या करंज्यास चीरपत्रे देऊन पाठविले मग आपण निरोप घेऊन थलास गेलो थलकरियासी ते व आह्मी भेटलो थलकरियानी करिना विचारला जे वंशपरंपरा लेहून देणे ह्मणून आज्ञ ०॥ केली आह्मी व तिमाजीने व सटवोजीने वंशपरंपरा लेहून दिल्हे मग थळकरियानी निश्चय केला जे वाती लावाव्या ऐसे केले अगर बेल काढून द्यावा अगर बावीचे उदक आणावे ऐसे तीन दिव्य नेमून त्यास तिमाजी च सटवोजी पाटील नामुकूर होउुन खलवाद करून पांढरीवरी च दिव्य करू ह्मणून बोलिले बोलिल्याप्रमाणे थळकरीयानी कागद दिल्हा तो कागद आह्मी घेऊन जाधवरायापासी आलो जाधवरायानी कागद मनास आणून लटके ऐसे ध्यानास आले मग दोघाची समजावीस केली जे दीपवाली करिता गावावरी दिव्य देऊन ऐसे करून अमानत करून आह्मास गावास पाठविले मग जाधवरायाची पाठी करून जाधवरायानी सटवोजीस असीनखानाचे हाती दिल्हे मग ते उंबरजेमध्ये कोट बांधोन जोरावारी करून राहिला बळे च वतन खात आहेत आह्मी परागंदा होऊन फिरत आहो जाहाला करीना बादगीस लेहेला आहे ते तकरीर लिहीली सही बळी सुमार ४२५ बंद ११
(निशाणी नांगर)