ते कवण कवण ।। नांवे तयाचि जाण ॥
तीं ऐका सावधान ।। श्रोते--हो ।। ३२ ॥
काळदंत १ सोमदत्त २ विख्यात ३
हेमरक्त ४ कृतांत ५ विरुदंत ६
येक्षदंत ७ काळकोट ८ शुभ्रमणी ९
हे नवनाग येवोनी ॥ सजिव केलि बाहुलिं त्याणी ।।
मग युद्धासि जावोनी ॥ चक्रचुडामणि गंगे तिरी पावला ।। २८० ।।
मग जालि आदळाआदळ ॥ युद्ध जालें तुंबळ ।।
पैलतिरी विक्रम सबळ ।। राहिला असे ॥ २८१ ॥
सैन्य मारिलें शाळिवाने ।। विक्रमावरि केले पेणे ।।
नदि उतरतां सैन्य ।। उमळे शाळिवानाचे ।। २८२ ।।
तेधवा शाळिवान विचार करी ॥ मृतिका विरालि जळीं ।।
नवनाग धाविल ते वेळीं ।। शाळिवान रक्षावया ॥ २८३ ॥
मग पावला पैल तिर ।। विक्रम लक्षिला समोर ।।
बाण लाविला खडतर ।। विक्रमादित्य तेणें उडविला ॥ २८४ ॥
तो उज्जनि --नगरि पडिला ।। तेथें मुक्ति पावला ।।
शाळिवान शकाधिकारि जाला ।। पैठणासी ।। २८५ ॥
मग ते नाग नव जण ।। आज्ञा मागोन निघाले जाण ।।
शाळिवान विनवि त्यां लागुन ।। तें अवधारा ॥ २८६ ।।
नावेक राहावें स्थिर ।। आळंगिले सत्वर ।।
तुम्हा वेगळा आम्हासि कोण ।। आहे येथे ॥ २८७ ॥
मग ते राहिले तेथे ।। कार्ये कराविं समर्थे ।।
म्हणे शेषआज्ञा आणिन सत्य ।। तुम्हा कारणे ।। २८८ ॥
तुम्ही राहावें सावचित्त ।। मनिचा सांडोनि संकल्प ।।
विनति माझी दत्तचित्त ।। आईका स्वामी ॥ २८९ ॥
मी तरि शकाधिकारी ।। शेष अवतार महि वरी ।।
कलयुगिं धर्मरक्षणाईत कुमारिकाउदरी ।। येणे जाले ॥ २९० ।।
या उपरि आइका श्रोते ।। कथा वर्तलि सत्य ।।
ऋषि वदला वाक्य ।। वागेश्वरी ।। २९१ ॥
मग शाळिवान राज्ये करितां ॥ तयासि कोपलि पाताळदेवता ॥
शाप दिधला तत्वता ।। शाळिवाना लागी ॥ २९२ ।।