Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
वास्तव साधनांची उदाहरणे कोणती व भ्रांत साधनांची उदाहरणे कोणती ती खालील यादीत क्रमवार देतो--
१ वास्तव ध्वनी : मानुष व बाह्य सृष्टीतील पदार्थांचे
२ भ्रांत ध्वनी : अज्ञात उगमापासून निघालेले
३ वास्तव भाषा : व्यवहारात बोलतात ती
वास्तव ऊर्फ शुद्ध भ्रांत ऊर्फ शबल
४ भ्रांत भाषा : अज्ञातोद्भव ध्वनीच्या अनुकरणाने -हां -हीं -हूं इत्यादी मंत्रभाषा
५ वास्तव गान : स्वरोद्भव
६ भ्रांत गान : ङुं ङुं णे, गुणगुणणे, पुटपुटणे इत्यादी मंत्रगान
७ वास्तव काव्य : शिवाजी काव्य, नारायणवध, पोपचे डन्शियाड, मनाचे श्लोक इत्यादी
८ भ्रांत काव्य : मिल्टनचे पॅरेडाइज लॉस्ट, डांटीची काव्ये, कुमारसंभव इ. इ.
९ वास्तव वाद्ये : सनया, ढोल, इत्यादी
१० भ्रांत वाद्ये : डौर (डमरू), कुडबुडे इत्यादी
११ वास्तव रेखन : वस्तुदर्शक रेघा
१२ भ्रांत रेखन : तोडग्यांच्या सरळ, वक्र व नागमोडी रेघा
१३ वास्तव अक्षरे : अ, क, इत्यादी
१४ भ्रांत अक्षरे : ओंकार, यंत्रे, स्वस्तिके वगैरे
१५ वास्तव चित्र : पशुपक्षी इत्यादींचे
१६ भ्रांत चित्र : राक्षसकिन्नरदेवदानवादींचे
१७ वास्तव सचित्रग्रंथ : इतिहास, सुतारकी, लोहारकी इत्यादींच्या विशदीकरणार्थ
१८ भ्रांत सचित्रग्रंथ : पुराणे, माहात्म्ये, इन्फर्नो इत्यादींच्या विशदीकरणार्थ
१९ वास्तव प्रकाशलेखन : फोटोग्राफी इत्यादी
२० भ्रांत प्रकाशलेखन : आकाशात कल्पनेने नगरे वगैरे पहाणे