Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
ह्या ध्वनींना मंत्र ही संज्ञा आहे व साधनाला मंत्रसाधन हे अभिधान आहे. अज्ञातोद्गम किंवा काल्पनिक ध्वनी जसे कित्येकांना ऐकू येतात तशीच आकाशनगरे, गंधर्वपु-या, सूर्यमुखे वगैरे चित्रेही कित्येक मनुष्यांना आकाशात म्हणजे अवकाशात दिसतात. हीच काल्पनिक चित्रकला होय. कित्येक मनुष्यांच्या अंगात संचार होऊन ती नाना प्रकारचे वेडेविद्रे हावभाव, आळेपिळे दाखवितात व पिंगे घालतात. हेच काल्पनिक तांडव ऊर्फ नृत्य होय. आणिक कित्येक मनुष्ये भ्रांतीने पिशाच, राक्षस, खैस, वेताळ, स्वर्ग, नरक, पाताळ, देव, दानव वगैरे घनाकृती बनवितात. हेच काल्पनिक मूर्तिकरण व स्थापत्य समजावे. अज्ञानोद्भव भ्रांतिकृत ध्वनी, रेखा, हावभाव व घनाकृती ह्या काल्पनिक साधनचतुष्टयाचा जोड उपरिनिर्दिष्ट ज्ञातोद्गम विश्वसनीय वास्तविक साधनांना दिला म्हणजे जो नकाशा बनतो तो असा :
विकारविचारप्रदर्शनाची साधने
वास्तव उर्फ शुद्ध भ्रांत ऊर्फ शबल
१ ध्वनि-भाषा-गान-काव्य-वाद्य १ ध्वनि-भाषा-गान-काव्य-वाद्य
२ रेखन-अक्षर-चित्रण-चित्र २ रेखन-अक्षर-चित्रण-चित्रमयग्रंथ
मयग्रंथ प्रकाशलेखन -प्रकाशलेखन
३ हावभाव-अभिनय-तांडव- ३ हावभाव-अभिनय-नृत्य-नाटक
नाटक-कळसूत्र -वेताळसभा
४ घनाकृति-भांडी-मूर्ति-स्थापत्य ४ घनाकृति-भांडी-मूर्ति- स्थापत्य
-भूमिरचना -भूमिरचना