Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(५९) प्राकश्रृंगवान बृद्धकन्या नामक वृद्ध कुमारिकेस अशी अट घालितो की, मी तुजसमागमे फक्त एक रात्र राहीन. त्याप्रमाणे राहून, ती वृद्धकन्या गेली (शल्य.५२).

(६०) शंख आणि लिखित :-ज्येष्ठ बंधूच्या अनुमतीशिवाय फळे खाल्ली म्हणून लिखिताचे हात राजाकडून तोडविले (शांति-२३).
Primogeniture Right of (अग्रजाधिकार).

(६१) स्त्रिया रजोदर्शनाने शुद्ध होतात (शांति-३५). ही कल्पना भारतीयात अगदी वन्यावस्थेपासून आहे. तेव्हा पिता, माता, इत्यादी संबंध त्यांच्यात झाले नव्हते, तेव्हापासून ही कल्पना अस्पष्टपणे त्यांच्यात होती. पुढे अनेक स्त्रियांवर एका पुरुषाची मालकी झाल्यावर त्यांपैकी कोणी व्यभिचार केल्यास पुरुष वरील कल्पनेने समाधान मानून घेत.

(६२) तीनही वर्णांची संतती ब्राह्मणाच्या योगाने संकीर्ण झालेली आहे. शूद्राची देवता प्रजापती म्हणजे रक्तसंबंध असलेल्या टोळीचा मालक किंवा नेता Master or leader of the consanguinous clan. ब्राह्मण हा सर्व वर्णांचा प्रजापती आहे (शांति-६०), ब्राह्मण ज्येष्ठ व श्रेष्ठ आहे (शांति-७२).

(६३) यवन, किरात, गांधार, चीन, शबर, बर्बर, शक, तुषार, कंक, परहव, आंध्र, मद्रक, पौंड्र, पुलिंद, रमठ, कांबोज हे सर्व आणि ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यापासून उत्पन्न झालेले वैश्य व शुद्र या जातीचे संकीर्ण वर्ण हे धर्माचरण कसे करतील? या दस्यूंनी सर्वांची शुश्रूषा करावी, पितृयज्ञ करावे, वापी खणाव्या, पाणपोया, शय्या, ब्राह्मणांना दाने द्यावी–पाकयज्ञ करावे व ब्राह्मणक्षत्रियांच्या यज्ञात दक्षिणा द्यावी (शांति-६५).

(६४) क्षत्रियापासून निषादीच्या ठायी झालेला निषाद भारतधर्मी झाल्याची हकीकत (शांति-१३५). आर्यानार्य संकराची उन्नती कशी झाली असेल ते या कथेवरून समजते.

(६५) Cannibalism नरभक्षण प्रथा :-अगस्त्य मुनींनी क्षुधाक्रांत झाल्यामुळे वातापि राक्षस भक्षण केला (शांति-१४१). नृशंस माणसे मारणारा (mankille) नृ + शंस् = to kill.

(६६) मृताकरिता अश्रुमोचन, ऊर बडविणे इ. इ. ह्या चाली रानटी देशातील स्मारक आहेत. एका टोळीने दुस-या टोळींतील माणसे मारिली म्हणजे त्यांचे आप्तइष्ट रडत. ज्या मृतांना आप्तेष्ट नसत त्यांच्याकरिता कोणी रडत नसे. सबब, रडणे हा आप्तेष्टांचा धर्म म्हणजे समाजमान्य रूढी झाली.

(६७) रजस्वला समागम करणारे पातकी होत. शूद्र स्त्रीबरोबर बारा वर्षे राहणारा, जिच्याशी आपला विवाह झाला नाही तिला शय्येवर घेणारा, गुरुस्त्रीगमक, व्यभिचारी स्त्रीस श्वानाकडून भक्षवावी (शांति. १६५).

(६८) नग्न परस्त्रीचे अवलोकन करू नये, धर्माशी अविरुद्ध असे मैथुन करावे व तेही एकांतात करावे (शांति.१९३).

(६९) युवनाश्व राजाने आपल्या प्रिय स्त्रिया ब्राह्मणांना दिल्याने त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती झाली (शांति. २३४).