Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(५४) मातेचे शव वृक्षास बांधून ठेवण्याची चाल सैबीरियात आदळते ( विराट ८-५ पृ. ११ a). पांडवांनी आपली शस्त्रे ठेवली तो शमीवृक्ष.

(५५) कीचकाच्या शवाबरोबर सैरंध्री जी द्रौपदी तिला जाळण्याकरिता नेतात (विराट- अ. २२ । २३). This custom was to carry everything loved by the dead. मृत व्यक्तीला जे प्रिय होते ते सर्व बरोबर नेण्याची चाल होती.

(५६) दौहित्रांनी मातामहाचा उद्धार : माधवीची कथा (उद्योग - २१)
पुत्रिकापुत्र.
Sons of daughters supported fathers of daughter. Sons were begotten from males of other clans. From this custom sprang the custom of considering कानीन s as sons. कानीन s were begotten on a daughter from a stranger at home.

मुलींची मुले मुलींच्या वडलांचा सांभाळ करीत. इतर टोळीतील पुरुषांचेपासून मुले होत. या चालीतूनच कानीन यांना अपत्य समजण्याची प्रथा अस्तित्वात आली. कानीन म्हणजे मुलीला घरीच बाहेरच्या पुरुषांपासून झालेले अपत्य.

(५७) पुत्र मातांशी रत होत आहेत, म्हणून दुश्चिन्ह (भीष्म-३).