Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(८७) यौधेय हे नृगाची संतती (हरि -३१).

(८८) बलीला संतती त्याची स्त्री सुदेष्णा हिला दीर्घतप नामक ऋषीपासून झाली (हरि -३१).

(८९) पुरुकुलोत्पन्न राजे व कुशिक कुलोत्पन्न ऋषी त्यांचे आपसात संबंध झालेले आहेत. (हरि - ३२).

(९०) यदुवंशीय महिष्मान् राजाने माहिष्मती वसविली. (हरि -३३, पृष्ठ १०२ b) प्रथम ही नगरी कर्कोटक नागांची होती ती कार्तवीर्य अर्जुन यदुवंशी याने जिंकली व तीत मनुष्यांची वस्ती केली (हरि - ३३ ). सहस्त्रार्जुन रावणाचा समकालीन. हा सहस्त्रार्जुन भार्गवराव परशुराम याचे हातून मेला. परशुराम रामाचा समकालीन. मृत्तिकावती व शुक्तिमती ही दोन नगरे नर्मदेवर यादवांनी वसविली (हरि -- ३६ ). माहिष्मती, करवीर वनवासी (क्रौंचपूर).

(९१) सुतनु व वडवा या कृष्णपिता वसुदेव याच्या परिचारिका म्हणजे भोगांगना होत्या (हरि-३५). शिवाय १४ पत्न्या वसुदेवाला होत्या.

(९२) विदर्भाची स्त्री त्याच्या अगोदर निदान १६ वर्षांनी वडील होती (हरि. ३६, पृ. ११०). प्रद्युम्नाने हरण केलेली शंबुर असुर स्त्री मायावती त्याच्याहून २०/२५ वर्षांनी वडील होती (हरि १०७).

(९३) अपत्यवध-देवकीचे सात पुत्र कंसाने मारिले (हरिवंश).


(९५) कृष्णाभिषेककाली इंद्राने मथुरेतील गणिकांना इतर नागरिकांप्रमाणे शंभर सुवर्णभाग काढून ठेविले (हरि ५५).

(९६) शक, तुषार, दरद, पारद, शृंगल, खस, पल्हव, हैमवत इत्यादि म्लेंच्छ (हरि ५७).

(९७) कृष्णाने रुक्मिणीला हरण केले तेव्हा मोठे घनघोर युद्ध झाले व कित्येक लोक ठार झाले. म्हणजे अद्याप हरणक्रियेला केवळ रूढीचे व देखाव्याचे रूप आले नव्हते (हर ५९). यावरून कृष्णकालीन संस्कृतीचा अंदाज होतो.