Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(४५) जरत्कारू व अगस्त्य यांना आपले पितर उलटे लोंबत असलेले दिसले. अपत्य त्यांना पडू देत नाही. a horde which did not catch females from another horde came naturally to an end. दुस-या टोळीतून स्त्रिया पळवून न आणणारी टोळी सहाजिकच नष्ट होई (आदि. व वन - ९६)
(४५) युवनाश्व गर्भार राहिला व त्याची बरगडी फोडून मांधाता पुत्र जन्मला (वन १२६). इंद्राने मांधात्याला आपल्या तर्जनीने पाजिले. (convade) स्त्रीकर्मांनुकरण.
(४७) सोमकाने आपला पुत्र जंतू याचा होम केला (वन. १२७ - १२८).
(४८) कृतयुगांत सर्व चतुष्पाद धर्म येतात. त्रेतां यज्ञ सुरू झाला. द्वापारात तप व दान होते. कलींत भक्ती सुरू झाली (वन. १४९) यज्ञ व तप लोपली.
(४९) सप्तर्षीच्या स्त्रियांचा व अग्नीचा अन्योन्य समागम (वन. २५५ । २२६).
(५०) रावण वश न झालेल्या स्त्रीशी समागम करू शकत नाही (वन. २८०).
(५१) सुग्रीवाची स्त्री तारा त्याचा पराभव झाल्यावर सुखाने वालीकडे गेली आणि जय झाल्यावर पुन्हा निमूटपणे सुग्रीवाकडे आली (वन - २८०).
(५२) मातेचा पती मेल्यावर तिचे संरक्षण करणारा पुत्र, असे शब्द अश्वपती राजाच्या तोंडून निघाले. Mother's husband means any husband even other than the progenitor of the son- आईचा पती याचा अर्थ आपल्या मुलाचा पिता नसलेलाही कोणताही पती (वन २८३).
(५३) कुंतीने सूर्याला आव्हान केले तेव्हा तिला रजोदर्शन झाले नव्हते, ती अप्रौढ होती. परंतु, लगेच रजोदर्शन होऊन ती समागमेय झाली (वन - ३०६). यावरून This shows that immature girls cohabited with men, वयात न आलेल्या मुलींचा पुरुषाशी संबंध होई असे दिसते.
सूर्योपभोगानंतर कुंती कुमारीच म्हणजे अक्षतयोनि राहिली.
(वन - ३०७) सूर्य म्हणतो, कन्या शब्दाची व्युत्पती कम् धातूपासून झाली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. तिजवर कोणाचाही अधिकार नाही. अधर्म नाही. स्त्रिया व पुरुष यामध्ये आडपडदा नसणे हीच लोकांची मूळची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार कृत्रिम आहेत. तू जरी माझ्याशी समागम केलास तरी कुमारीच राहशील.