Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(७६) ब्राह्मणाच्या अवकृपेमुळे शक, यवन, कांबोज व इतर क्षत्रिय जाती शद्र झाल्या. ब्राह्मणांच्या अवकृपेमुळे द्राविड, पुलिद, उशीनर, कोलिसर्प व इतर क्षत्रियजाती शूद्र झाल्या (अनुशासन - ३३).
ब्राह्मणाच्या अवकृपेमुळे मेकल, द्राविड, लाट, पौंड्र, शबर, बर्बर, कान्वाशिर, किरात, यवन व इतर क्षत्रियजाती शूद्र झाल्या (अनुशासन - ३५).

(७७) स्त्रिया अन्योन्याश्रय करून व्यभिचार करतात (अनुशासन - ३८). असे पंचचूडा अप्सरा नारदास सांगते.

(७८) उत्तरकुरूत स्त्रिया स्वच्छंदाने वागतात व नरनारीमध्ये मत्सर बुद्धी वास करीत नाही. (अनुशासन - १०२).

(७९) ज्येष्ठ भ्रात्याची प्रशंसा (अनुशासन - १०५).

(८०) उतथ्याची भार्या वरुणाने पळविली व भोगिली. नंतर वरुणाला शिक्षा करून उतथ्याने आपली बायको परत आणून तिच्यासह तो सुखे नांदू लागला (अनुशासन - १५४).

(८१) मनू आपली मुलगी इला इजशी समागम चाहू लागला (हरिवंश - १०).

(८२) विश्वामित्राच्या स्त्रीने आपला पुत्र त्याच्या गळ्याला दोरी लावून विकावयास काढिला (हरिवंश - १२).

(८३) यवन, पारद, कांबोज, पल्हव व खस हे गण म्हणजे आयुधोपजीवी संघ होते (हरि - १४). शक अर्धे डोके मुंडीत, यवन व कांबोज सबंध डोके मुंडीत, पारद मोकळ्या जटा ठेवीत व पल्हव दाढ्या ठेवीत. कोली सर्प, महिष, दीर्घ, चोल व केरळ ह्या लढाऊ गणांच्या धर्माचा उच्छेद सगराने केला. खस, तुषार, चोल, मद्रक, किष्किंधक, कौंतल, वंग, साल्व व कौंकणक यास सगराने जिंकिले.

(८४) जन्हूची मुलगी गंगा हिने जन्हू आपला बाप याला पती केले (हरि-२७).

(८५) गाधिराजाची मुलगी सत्यवती ऋचीक ब्राह्मणाला दिली होती. ऋचीकाने दोन चरू सत्यवतीला व तिच्या आईला दिले. अदलाबदल झाली व गाधीला ब्राह्मण स्वभावाचा मुलगा झाला व सत्यवतीला क्षत्रिय स्वभावाचा मुलगा झाला. येथे स्त्रियांची अदलाबदल सासरा व जावई यांच्यात झालेली स्पष्ट दिसते, जावई सासूकडे गेला व सासरा मुलीकडे गेला.

(८६) सर्व गोत्र प्रवर्तकांत अत्रीचा मान श्रेष्ठ, यज्ञात आत्रय ब्राह्मणाला स्वतंत्र दक्षणा देतात. स्वस्त्यात्रेय (हरि - ३१ पुरुवंशाची कथा.)