Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(३४) सुभद्राहरण कृष्ण व युधिष्ठिर यांच्या अनुमतीने व सर्व यादवांच्या अनुमतीने होते (आदि २२०).

(३५) जरा नामक नरमांसभक्षक राक्षसीने दोन शकले असलेले जरासंध नामक बालक चवाट्यावरून ओढीत नेले (समा - १७ - पृ. ५१ b). हेच राक्षस महारादि लोकांचे पूर्वज असावेत.

(३६) माहिष्मती नगरीतील स्वच्छंद स्त्रिया (सभा ३१).

(३७) पती कोणत्याही स्थितीत असला तरी स्त्रीवरची त्याची सत्ता नाहीशी होत नाही असे भीष्म म्हणतात (सभा - ६७)

(३८) कुलाचा अधिपती त्यांतील व्यक्तींचा मालक व व्यक्तींच्या पुण्याचा व तपाचा अधिकारी असतो. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्राणाचाही अधिकारी असतो (सभा - ७०) असे भीम द्रौपदीला सभेत आणली असता म्हणतो.

(३९) मालक जिंकिला गेल्यावर त्याची कुलांतील व्यक्तींच्या प्राणावरील मालकी उडते असे भीम प्रतिपादितो (सभा - ७०)

(४०) धृतराष्ट्राला प्रजापति म्हटले आहे (सभा - ७५). सप्त प्रजापति. प्रज शब्द जुनाट मराठी लेखातून येतो.

(४१) Incest रक्तसंबंधी नात्यात सुरतसंबंध : ऊर्वशी ही पौरव वंशाची जननी अर्जुनावर कामासक्त झाली. ती म्हणाली, अप्सरास कसलाच प्रतिबंध नाही. पुरूच्या वंशातील जे पुत्र अथवा नातू इंद्रलोकी येतात ते आमच्याशी रमतात, तथापि ते अधर्म्य नसते. परंतु अर्जुनाने तिची ही याचना मान्य केली नाही. Incest wa8 unknown to अप्सरा s, रक्तासंबंधी नात्यात सुरतसंबंध माहीत नव्हते. तेव्हा ऊर्वशीने शाप दिला की तू षंढ होशील (वन, ४६). पुरूरव्याला उर्वशीपासून ७ पुत्र झाले (हरि. २५).

(४२) नलदमयंती : इंद्र, अग्नी, यम आणि वरुण या देवांपैकी एकास दमयंतीने वरावे असे नल म्हणतो. अर्यमन् , पूषन् , वरुण यांचा उल्लेख अश्वलायन् गृह्यसूत्रात येतो (१, खं. ७ सूत्र १३). ह्यांच्यापासून सुटका होऊन मनुष्यवराला नवरी मिळावी व मिळते. एके काळी देवांशी विवाह करणे मनुष्यांना अभिलषणीय वाटे, याचे हे चिन्ह राहिलेले आहे.

(४३) यज्ञात ऋत्विजांकडून प्रजोत्पादन, यालाच अयोनिज प्रजा म्हणत असत (द्रौपदी, इ. इ. इ.).

(४४) लोपामुद्रा अगस्त्याची मुलगी. हिला विदर्भराजापाशी ठेवून, उपवर झाल्यावर हिचे अगस्त्यानेच पाणिग्रहण केले (वन. ९६ । ९७ । ९८). Incest.