Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(९८) कृष्णाने १६००८ नारी विवाहविधीने वरिल्या (हरि ६०).

(९९) पुण्यक व्रतात स्त्रिया त्यांच्या भर्त्यांपासून विकत घेऊन आचार्यास उदकपूर्वक द्याव्या. नंतर द्रव्य देऊन आचार्यापासून त्या स्त्रिया परत घ्याव्या (हरि ७९).

(१००) गौरीशंकराच्या चित्रमय मूर्ती, लाकडी मूर्ती, दगडी मूर्ती ब्राह्मणास द्याव्या (हरि ७९).

(१०१) ब्रह्मदत्तला २०० ब्राह्मण, १०० क्षत्रिय, १०० वैश्य व १०० शूद्र मिळून पाचशे स्त्रिया होत्या (हरि ८३).

(१०२) प्रत्येक संगमाच्या वेळी त्यांच्या कन्या कुमारी असल्यासारख्या होतील (हरि ८३ ).

(१०३) निकुंभाच्या वज्रनाभ नामक भ्रात्याची प्रभावती कन्या प्रद्युम्नाने हरण केली. सबब निकुंभाने भानुमती नामक भानु यादवाच्या कन्येचे अपहरण केले (हरि ९०). बाणासुराची कन्या उषा अनिरुद्धाने वरिली (हरि १२८).

(१०४) सुपुर, विपुर, वृत्र, शुष्ण हे देश आहेत. सुपुरवासी असुर (हरि ९३, पृष्ठ ४६१).

(१०५) कुमारीपतिः, कुमारी म्हणजे काय ? दुर्वासाने असुरकन्या प्रभावतीला (प्रद्युम्नाच्या स्त्रीला) अखंड सौभाग्य व कौमार्य दिले (हरि ९४).

(१०६) अश्वमेध यज्ञात यजमानपत्नी मृत घोड्यापाशी निजते (हरि भविष्यपर्व५).

(१०७) गोत्र All the women of one tribe are the wives of all the men of another tribe.
(एका टोळींतील सर्व स्त्रिया दुस-या टोळींतील सर्व पुरुषांच्या बायका).

(१०८) दक्षाच्या कन्या २७ सोमाला etc., groups of sisters are marrying of one husband. येथे अनेक बहिणी एकाच पतीशी विवाहबद्ध होतात. Letournaou 299 base. लेटार्नो २९९.

(१०९) पुत्रिकापुत्र-is a trait of maternal filiation. ही मातृसंततीची प्रथा आहे. Letournaou 310.

(११०) दिति-दैतेयः दैत्यः, अदिति, आदितेयाः, आदित्यः वैनतेयः, आंजनेयः, कौंतेयः, राधेयः, भाद्रेयः, सौभद्रः. These show maternal filiation. हे मातृसंततीची प्रथा दर्शवितात.