Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(५८) आरट्ट देशातील, वाहीक देशातील स्त्रिया मैथुनकाली स्वपरपुरुष विचार राखीत नाहीत, अशी शल्याची कर्ण निंदा करितो (कर्ण-४४) व अभद्र शब्द उच्चारतात. त्यांच्यात जारज प्रजेचे अतिशय प्रमाण असते (कर्ण-४४). शूद्रापासून अन्य स्त्रियांच्या ठिकाणी झालेले अधम ब्राह्मण तेथे आहेत. प्रस्थल, मद्र, गांधार, आरट्ट, खस, वसाति, सिंधुसौवीर, कारस्कर, माहिषक, कालिंग, केरल कर्कोटक, वीरक इत्यादी भ्रष्ट देशांची नावे कर्ण घेतो.

आरट्ट देशात बहिणीच्या मुलांना वारसाहक्क प्राप्त होतो. पुत्राना तो होत नाही (कर्ण-४५).

वाहीक देशात मनुष्य प्रथम ब्राह्मण बनतो. मग क्षत्रिय होतो. मग वैश्य होतो. नंतर शुद्र होतो, आणि शुद्राची नापितही होतो, पुनः ब्राह्मण होतो व ब्राह्मणांचा पुनः गुलाम बनतो. (कर्ण -४४). गांधार, मद्रक व वाहीक या देशातील लोक निंद्य आहेत (कर्ण-४४).

पंचनद देशातील लोक म्हटले म्हणजे कृतयुगातसुद्धा अधर्माचरण करणारे (कर्ण४५). कृतयुग was allअधर्म, and in such a युग वाहिका s were होत्या.

भिक्षा मागणे हे क्षत्रियांना लांछन आहे. व्रतांचा त्याग करणे हे ब्राह्मणांना लांछन आहे, वाहीक लोक भूतलाला लांछन आहेत व मद्रस्त्रिया स्त्रीजातीला लांछन आहेत (कर्ण ४५).

१. कन्यादूषण, २. देख संगम ३. देवसंगम, ४. षंढ, ५. Barter (विक्री) कन्याविक्रय, ६. hire out (भाड्याने देणे)-माधवी, ७. हकीकत ब्रह्मदेवाच्या पूर्वीची. maternal(मातृप्रधान) प्रजापतीपासून निराळी नीतिमत्ता सुरू झाली.
Patriarchal (पितृप्रधान). ८. स्वयंवराची चाल :-

मद्र देशात पिता, पुत्र, माता, सासू, सासरा, मामा, जावई, मुलगी, भाऊ, नातू व दुसरे बांधव, सोबती, पाहुणे, दासदासी ही सर्व एके ठिकाणी मिसळतात. त्या देशातील स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी स्वेच्छेने सहवास करतात, मग ते पुरुष त्यांच्या ओळखीचे असोत किंवा नसोत. भलती सलती गाणी गातात. मद्रदेशामुळे गांधारीचाही आचार बिघडला. मद्र देशातील स्त्रिया दारू पितात व वस्त्रे टाकून नागव्या नाचतात. वैवाहिक विधींनी स्त्री-पुरुषांचे संबंध नियत होत नाहीत व स्त्रिया मन मानेल त्य पुरुषाला नवरा करतात. स्त्रिया उंट किंवा गाढवाप्रमाणे नैसर्गिक उत्सर्ग करतात. मद्र देशातील स्त्रियांपाशी कोणी मद्य मागितले तर त्या कुले खाजवीत खाजवीत मद्य देणार नाही. वाटेल तर पुत्र किंवा पती देऊ म्हणतात. मद्र देशातील कुमारिका निर्लज्ज व अनाचारी असतात (कर्ण ४०).

म्लेंछ सर्व मानवजातीला लांछन, औष्ट्रिक म्लेंछांना लांछन, षंढ औष्ट्रिकांना लांछन, राजपुरोहित षंढांना लांछन (कर्ण-४५). सुराष्ट्रातील लोक संकरवृत्ती आहेत (कर्ण-४५).

मद्र गुरुपत्नीगमन, भ्रूणहत्या करतात (कर्ण-४५).

पृथ्वीवर वाहीक लोकांचे वास्तव्य पृथ्वीला कमीपणा आणते असे नारद व्यासांना सांगतात (शांति. ३२८).

शल्य म्हणतो :-अंग देशात बायकामुलांचा विक्रय होतो (कर्ण-४५).