Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
(१७) उजवी मांडी मुलीची, डावी मांडी स्नुषेची
(आदिपर्व ९७ पृ. २१७ b)
प्रतीपाची कथा - गंगा उजव्या मांडीवर येऊन बसली.
२ ३ ४ १
(१८) कुल, गण व पक्ष, अन्वय (आदि. ६६ पृ. १४७ b)
(१९) प्रतीपाने मुलगी गंगा मुला (शंतनू) करिता पसंत केली. त्यात शंतनूचे मत बिलकुल घेतले नव्हते (आदि. ९८).
(२०) उतथ्याचा धाकटा भाऊ बृहस्पती उतथ्याच्या ममता नामक स्त्रीजवळ कामुक बुद्धीने गेला. संभोग देण्याची तिची हरकत नव्हती. परंतु ती गर्भार होती. सबब तिने हरकत घेतली (आदि. १०४)
देवरधर्म नियोगाची चाल.
( २१) बलिराजाने संतानोत्पादनार्थ दीर्घतमा ऋषीला घरी बाळगले. सुदेष्णेपासून दीर्घतम्याच्या वीर्याने अंग, वंग, कलिंग, पुंडू व सुम्ह असे पुत्र झाले (आदि. १०४). नियोगाची चाल म्हणून भीष्मांनी ही कथा सांगितली आहे.
(२२) काही थोडे द्रव्य देऊन एखादा ब्राह्मण बोलावून आणावा व त्याच्याकडून क्षेत्रामध्ये प्रजोत्पादन करून घ्यावे, म्हणून भीष्म सांगतात (आदि. १०५).
शरदंडायनाने आपल्या भार्येस पुत्रोत्पादन करण्यास सांगितले. तिने राजमार्गावर जाऊन एका ब्राह्मणास आमंत्रण दिले व त्या ब्राह्मणाकरवी पुत्रोत्पादन केले (आदि. १२०).
वडील दिराकडून पुत्रोत्पादन करावे (आदि. १२०).
सौदासाने आपल्या मदयंती स्त्रीला वशिष्ठाकरवी पुत्रोत्पादन करण्याची आज्ञा केली (आदि. १२२). यवनराजाने गार्ग्याकडून स्वस्त्रीचे ठायी कालयवन निर्मिला (विष्णुपुराण हरि - ३४).
(२३) मानस प्रजा, शवापासून प्रजा (आदि. १२१). व्युषिताश्वाची कथा. There was a myth current from very ancient times that children could be begot from the dead body of a husband. मृत पतीच्या शरीरापासून पुत्रप्राप्ति होऊ शकते अशी अतिप्राचीन कालापासून चालत आलेली कल्पना होती.
(२४) * (आदि-१२२) अतिप्राचीन कालीन विवाहनीती. स्त्रिया अनियंत्रितकौमारावस्थेपासून मैथुन-उत्तर कुरूंत म्हणजे तिबेटात हाच धर्म आहे म्हणून पांडू सांगतो. विवाहमर्यादा प्राचीन नाही. तिचा स्थापक श्वेतकेतू . ब्राह्मण श्वेतकेतूच्या मातेचा संभोगार्थ हात धरतो. त्याचा श्वेतकेतूस राग येतो व तो मर्यादा घालतो की (१) परपुरुषसंगत्याग, (२) परस्त्रीसंगत्याग, (३) पुत्रप्राप्त्यर्थ पतीच्या अनुज्ञेने परपुरुषसंग. श्वेतकेतूचा बाप उद्दालक म्हणतो की स्त्रियांनी स्वैरसंग करणे हा धर्म म्हणजे मान्य प्रचारच आहे.