Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
६४ मध्यमपुरुषाच्या एकवचनाची रचना त्वं या अर्थाचें सर्वनाम व तो किंवा हा या अर्थाची सर्वनामे मिळून होत्ये. अह् या उत्तमपुरुषसर्वनामाला त् हे सर्वनाम उपसर्ग म्हणून लागून त्वह् व हम् या उत्तमपुरुषसर्वनामाला त् हे जोड सर्वनाम उपसर्ग म्हणून लागून त् +हम् =त् + म्= त्व् अशी मध्यमपुरुषाची दोन सर्वनामे होतात. त् व स् ही सर्वनामे परस्पर विनिमेय असल्यामुळे त्व् स् चे किंवा स्व् चे रूप धारण करतो. अद् +त्व्+इ=अद्+स्+इ = अत्सि. अत्सि म्हणजे हा तू खातोस. अ+अद्+अ+त्व=आद्+अ+म्= आदस्; आदस् म्हणजे हा तू खाता झालास. अबिभर्+त्व् = अबिभर्+स्=अबिभर्; अबिभर् म्हणजे तू भरता झालास. भव्+अ+व+इ=भव +स्+इ=भवसि; भवसि म्हणजे हा हा तू होतोस. भव+अ+त्व्+ अ+इ=भव +स्+ए=भवसे; भवसे म्हणजे हा हा तू खास स्वत: होतोस. अ+भव्+अ+तह्+अ+अस्=भव्+अथ्+आस्= अभवथास्; म्हणजे हा तो तू खास स्वत: होता झालास. अब्रू+त्व+अ+अस्=अब्रू +थ्+आस्=अब्रूथास् म्हणजे हा तो तू स्वत: बोलात झालास. भव्+त्व्+अ=भव्+स्+अ=भव्+ह=भव् +अ=भव; भव म्हणजे हा तू हो. भव्+अ+त्व्+अ+अत् = भव+त+अत्=भवतात्; म्हणजे हा हा तो तू हो. कुणु+त्व्+अ+अत्= कृणु+त्+आत्=कृणुतात; म्हणजे हा तो तू कर. कृणु+त्व्+इ=कृणु+स्+इ=कृणु+ह्+इ= कृणुहि; म्हणजे हा तू कर. श्रुणु+त्+त्व्+इ=श्रुणु+ध+इ=श्रुणुधि; म्हणजे तो हा तू ऐक. भव्+अ+त्व्+अ=भव+स्व=भवस्व म्हणजे हा हा तू हो. ब्रू+त्व्+अ=ब्रू+स्व=ब्रूष्व; म्हणजे हा तू बोल.