Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
मध्यमपुरुषाच्या एकवचनी सकृत् चमत्कारिक दिसणारी रूपे म्हणजे गृहाण, स्तभान, अशान, बधान, मुषाण ही होत गृहणहि गृहणीतात् अशीही रूपे होतात. म्हणजे गृह्णा गृह्णी, या अंगांनाही तात् ही सर्वनामे लागतात. परंतु भूपासून जसे भव रूप होते तसे ग्रह्पासून कोणते रूप होते? ना हे क्रयादि धातूंचे विकरण धरले आहे. ग्रहादि धातूंना हे ना विकरण असून शिवाय आन् असेही वैकल्पिक विकरण असे. गृह्णा असे जसे अंग होते तसे गृहाण्, मुषाण अशी अंगे होत. या गृहाण् अंगाला त्व सर्वनाम लागून गृहाण + त्व=गृहाण+स्=गृहाण्+ह=गृहाण्+अ=गृहाण. गृहाण म्हणजे हा तू घे. या गृहाण रूपाची उपपत्ती लावताना आन् विकरण होणारे काही धातू होते ही अभूतपूर्व बाब उघडकीस आली. चकर् +तह्=चकर्+थ= चकर्थ; म्हणजे तू करतोस. येणेप्रमाणे मध्यम पुरुषैकवचनी अ, इ, त्व्, तह् ही सर्वनामे रचनेत येतात.
मध्यमपुरुषद्विवचनात तू व तो किंवा हा या अर्थाचीं सर्वनामे जोडून द्विवचन साधते. पा+तह्+स्=पा +थ +स्= पाथस्. तह् म्हणजे तू व स् म्हणजे तो. पाथस् म्हणजे तू व तो असे दोघे रक्षिता. भव् + अ + तह् + स् = भवथस्; भवथस् म्हणजे हा तू व तो असे दोघे होता. भव्+ अ + इ+ तह+अ+इ = भवे+थे= भवेथे म्हणजे हा तू खास व हा खास असे दोघे स्वत: होता. ब्रू+अ+अ+तह्+अ+इ= ब्रुवाथे; म्हणजे हा तू खास व हा खास असे दोघे स्वत: बोलता. अ+भव् + अ+ त्व्+ अम् =अभवतम्= अभवतम्; म्हणजे हा तू व तो असे दोघे झाला. अ+भव्+अ+इ+ तह्+अ+अम्= अभवे+थाम्=अभवेथाम्; म्हणजे हा तू खास व तो खास असे दोघे स्वत: झाला. जग्म्+अ+तह्+उ+स्=जग्मथुस्; म्हणजे हा तू व तो तो असे दोघे जाता.
जग्म्+अ+अ+तह्+अ+इ = जग्माथे; म्हणजे हा तू खास व हा खास असे दोघे स्वत: जाता इतर लकारांतील मध्यम पुरुष द्विवचनाची रूपे याच धर्तीने सहज उकलता येतील. द्विवचनरचनेत तह्, अ, इ, उ, अम्, स् या सर्वनामांचा उपयोग होतो.