Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

६३ प्रथम पुरुषरूपांच्या रचनेप्रमाणेच उत्तमपुरुषरूपांची व मध्यमपुरुषरूपांची घडण होते. उत्तम पुरुषाच्या एकवचनी मी या अर्थाचे सर्वनाम धातूपुढे येते. मी व तू मिळून आपण दोघे किंवा मी व तो मिळून आम्ही दोघे असा द्विवचन प्रत्ययांचा अर्थ असतो; सबब उत्तमपुरुषाच्या द्विवचनी रूपांच्या रचनेत मी व तू किंवा मी व तो या अर्थाची सर्वनामे येणार हे स्पष्टच आहे. मी व तू व तो किंवा मी व हा व हा किंवा मी व तो व हा मिळून आम्ही तिघे किंवा आपण तिघे असा त्रिवचन प्रत्ययांचा अर्थ असतो. सबब त्रिवचन रूपरचनेंत मी व तू व तो किंवा हा या अर्थाची तीन सर्वनामे येणार हे उघड आहे. अदिम = अद्हम्+ इ = अद् + म् + इ= अदिम हम म्हणजे मी व इ म्हणजे हा. मि म्हणजे हा मी. अद्मि म्हणजे हा मी खातो. आदम = आद + अ + हम् = आद + अ + हम् = आद + अ + हम् = आदम. अ म्हणजे हा व हम् म्हणजे मी. आदम् म्हणजे हा मी खाता झालो. भवा (लेट्) = भव् + आ+ अह् = भवा. आ हा लोट्चा विशिष्ट आगम् आहे. अह् म्हणजे मी. अह हे अहम्, हम् प्रमाणेच उत्तम पुरुषैकवचनाचे सर्वनाम असे. हे अह् सर्वनाम आत्मनेपद प्रक्रियेत हमेष येते. भवा म्हणजे मी हो वो ह्न भव्+आ+हन+इ=भव्+आ+न्+इ = भवानि. हन् म्हणजे भी व इ म्हणजे हा. भगनि म्हणजे हा भी होवो. भवामि यात म् उच्चारांकित उत्तमपुरुषसर्वनाम आलेले आहे, भवानि यात न् उच्चारांकित उत्तमपुरुषसर्वनाम आलेले आहे व भवा यात म् उच्चारांकितही नव्हे व न् उच्चारांकित हि नव्हे, असे अह् हे सर्वनाम योजिलेले आहे. हे भवा रूप वैदिकभाषेत आढळते, परंतु पाणिनीयभाषेत हे लोप पावले. लिङ् मधील याम्, इयम् या प्रत्ययात अ हे सर्वनाम असून लङ् प्रमाणेच त्याची जुडणी भवेय्, अद्या या धातूंशी होऊन भवेयम्, अद्याम् ही रूपे होतात. उत्तमपुरुषाच्या पारस्मायक एकवचनाची घडणही अशी होते. आत्मनायक घडण येणेप्रमाणे : भव् + अह् + इ = भवे. अह म्हणजे मी व इ म्हणजे हा खास. मिळून भवे म्हणजे हा प्रत्यक्ष खास मी होतो. अ + भव् + अह् + इ = अभव म्हणजे मी प्रत्यक्ष खास झालो. अ + ब्रुव् + इ= अब्रुवि म्हणजे मी खास बोललो. अब्रुवि या रूपात अह् सर्वनाम नाही. फक्त खास स्वत्वदर्शक इ या दर्शक सर्वनामावर काम भागविले आहे. भव्+आ+इ= भवै (लेट्). आ ही लेट् ची खूण आहे व इ म्हणजे खास स्वत: भवै म्हणजे खास मी होवो. भवेय् + अह् = भवेय. अह् म्हणजे मी. भवेय म्हणजे प्रत्यक्ष हा मी होइजे. जगाम् + अह् = जगामह्न जगाम म्हणजे मी जातो. जग्म्+अह्+इ= जग्मे. जग्मे म्हणजे हा मी प्रत्यक्ष स्वत: जातो. येणेप्रमाणे अ, अह् किंवा अस्, इ, उ, हम्, हन ही सर्वनामे उत्तमपुरुषाच्या एकवचनाच्या रचनेत येतात.