Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
उस् (उ+स्) म्हणजे तो तो.
४) त् : या सर्वनामाचा अर्थ तो.
५) अत् : अ म्हणजे हे व त् म्हणजे ते मिळून अत् म्हणजे हे ते.
६) अस् : अ+स्=अस् स् या सर्वनामाचा अर्थ तो. अस् म्हणजे हा तो. हे जोड सर्वनाम भवतस् (भव्+अत्+अस्) या रूपात येते. अस्+अ = अस असा जोड होतो. अस हे जोड सर्वनाम असौ = (अस + उ = असौ ) या रूपात येते.
७) अन् : या सर्वनामाचा एक अर्थ बहुत असा अनेकवचनी आहे. भवन्ति (भव्+ अन् + त् + इ), अभवन्, भवन्ते, अभवन्त, भवन्तु, भवन्तामु, इत्यादी रूपात हे सर्वनाम येते. या सर्वनामाचा दुसरा अर्थ हा असा आहे. या सर्वनामाचे १) अन् + अ = अन, २) अ + इ+ =ए + अन् + अ= एन, ३) अन् + य= अन्य, व ४) अन् + एक = अनेक, असे चार जोड होतात. अनेन, अनया, अनयो: या तीन रूपात अन हे जोड सर्वनाम येते. एनेन, एनया, एनयो: एनौ एनान् एना: या रूपात एन सर्वनाम येते. अन म्हणजे हा हा व एन म्हणजे हि हा हा. अन्य म्हणजे
हा जो, अनेक म्हणजे बहुत, पुष्कळ, दुसरे हे. ऐ सर्वनामाला अकच् होऊन एक सर्वनाम होते. एक सर्वनामाचा मूळ अर्थ हा. अनेक सर्वनामाचा अर्थ पुष्कळ हे.
८) ए : अ + इ मिळून ए सर्वनाम होते व याचा अर्थ हा. ए + त् + अ= एत, ए + अन् + अ = एन, ए+अस + अ= एष, असे तीन जोड होतात. एष म्हणजे तो हा. एभि: एभ्य:, एषां, एषु या रूपातील ए हे अ या सर्वनामाचे पुल्लिंगी प्रथमेचे अनेकवचन आहे, स्वतंत्र एकवचनी सर्वनाम नाही. भक्ते, भवन्ते, भवातै, भवान्ते, इत्यादी रूपात ए सर्वनाम येते.
९) अम् : या सर्वनामाचा अर्थ तो. भवताम्, अभवताम्, भवेताम् इत्यादी रूपात हे सर्वनाम येते. अम् + अ = अम हे जोड सर्वनाम होते, अथर्ववेदातीस अमोऽहमस्मि या मंत्रांत अम हे सर्वनाम आलेले सुप्रसिद्ध आहे, कारण हा मंत्र विवाह प्रयोगात म्हणतात. अम्+उ=अमु हे जोड सर्वनाम अम्, अमी, अमुना, अमुम्, अमूभ्याम् अभीभि: इत्यादी रूपात येते.
१०) रिर्, इर्, र : हे तीन त्रिर् या संख्या शब्दाचे अवशेष आहेत. यांचा उपयोग अन् प्रमाणे प्रथमपुरुषाचे त्रिवचन साधताना होतो.