Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
उत्तमपुरुषाच्या द्विवचनाच्या रचनेत तो व मी असे आम्ही दोघे किंवा तू व मी असे आपण दोघे, हा द्वैवचनिक मतलब प्रदर्शित करण्याकरता तो याअर्थी उ हे सर्वनाम व मी या अर्थी अह् किंवा अस् हे सर्वनाम योजीत. अह् या सर्वनामाचा उच्चार अह् किंवा अस् असा दुहेरी होत असे. हा मी व तो मी असाही जोड होऊन हा या अर्थी अ सर्वनामाचा, तो या अर्थी उ सर्वनामाचा व मी या अर्थी अह् किंवा अस् सर्वनामाचा उपयोग करीत. अद्वस् = अद् + उ + अस् किंवा अह् = अद्वस् किंवा अद्वह किंवा अद्व: अद्व: म्हणजे तो व मी असे आम्ही दोघे खातो. भवावह् = भव्+अ+अ+उ+ अस् = भव +अ+वस् = भवावह्, भवावस्, भवाव:, भवाव: म्हणजे हा मी व तो मी असे आम्ही दोघे होतो. आद्व = अ+अद्+उ+अह् = आद्+व अ = आद् + व= आद्व. आद्व म्हणजे तो व मी खाते झालो. अभवा =अ+भव्+अ+अ+उ +अह् = अभवा + वह्= अभवा + अ व = अभवाव. अभवाव म्हणजे तो मी व हा मी असे आम्ही दोघे झालो. ए (अ+इ) हे स्वत्वदर्शक म्हणजे खासपणा दाखविणारे जोड सर्वनाम परस्मायक रूपांना लागून भवावह् + ए= भवावहे, स्वह् + ए = स्वहे, ही आत्मनायक रूपे होतात. इ हे स्वत्वदर्शक सर्वनाम लागून अभवाव (ह्) + इ= अभवावहि, आस्व (ह्) + इ = आस्वहि ही आध्मनायक रूपे होतात. वह् आणि व (वह्=वअ+व) ही दोन जोड सर्वनामे मूलत: एकच आहेत हे अभाववहि व आस्वहि या आत्मनायक रूपांवरून उघड होते. मूळ परस्मायक रूप अभवावह् व आस्वह् असल्यावाचून अभवावहि व आस्वहि ही रूपे इ सर्वनाम लागून साधली जाणार नाहीत. भवाव: व भवाव ही रूपे मूलत: एकच आहेत हे सिद्ध करण्यास एक ज्ञापक आहे, स उत्तमस्य (३ह्न४ह्न९८) या सूत्रात पाणिनी सांगतो की लेट् ची करवाव व करवाव अशी दोन वैकल्पिक रूपे होतात. ती दोन्ही रूपे ज्याअर्थी एकार्थक असतात त्याअर्थी वह् व व ही जोड सर्वनामे एकार्थक व एकच आहेत हे मुद्दाम सांगावयाला नको. आत्मनायक इतर लकारांच्या रूपात विशेष भानगड नसल्यामुळे त्यांचे पृथक्करण करून जागा अडवीत नाही. उत्तम पुरुषाच्या द्विवचनाच्या रूपांच्या साधनिकेत अ, इ, उ, अह् ऊर्फ अस् ही सर्वनामे येतात.