Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
उत्तमपुरुष बहुवचनह्न त्रिवचनाच्या साधनिकेंत ह्म, अ, व, स् किंवा ह्म, अस, व इ अशी सर्वनामे येतात. ह्म म्हणजे मी, अ म्हणजे हा व स् ऊर्फ ह् म्हणजे तो, मिळून मी, हा व तो असे आम्ही तिघे. अद्म = अद् + हम् + अ+स् =अद् +म्+अ+स्=अद्मस् अद्मस् म्हणजे मी, हा व तो असे तिघे खातो. भवामस् = भव् +अ+अ+ह्म+ अस् = भवामस्. भवामस् म्हणजे हा, हा, मी व हा असे चौघे होतो. भवामसि= भव+अ+अ+ह्म + अस्+ इ = भवामसि. भवामसि म्हणजे, हा, हा, मी व तो व हा असे आम्ही पाच होतो. अद्मस् या रूपात तीन सर्वनामे आहेत, भवामस् या रूपात चार सर्वनामे आहेत व भवामसि या रूपात तीन सर्वनामे आहेत, अर्थात वेदपूर्वभाषेत जसे त्रिवचन होते, तसेच चतुर्वचन व पंचवचनही होते. ऋग्वेदात मसि हा प्रत्यय मस् या प्रत्ययाहून पाचपट जास्त येतो आणि अर्थर्ववेदांत मस् हा प्रत्यय मसि या प्रत्ययाहून जास्त येतो. ऋग्वेदकाली ही जोड सर्वनामे प्रत्यय होऊन बसल्यामुळे भवामसि व भवामस् ही दोन्ही रूपे एकार्थक म्हणजे केवळ बहुवचनार्थ समजली जात. परंतु मूळ प्राथमिक भाषेत तिघांसंबंधाने बोलावयाचे म्हणजे भूमस, चौघासंबंधाने बोलावयाचे म्हणजे भवामस् व पांचासंबंधाने बोलावयाचे म्हणजे भवामसि अशी रूपे, वस्तुत: वाक्ये योजीत, हे पृथक्करणान्ती लक्षात येते. परस्मैपदी रूपांना ए (अ+इ) हे स्वत्वदर्शक जोड सर्वनाम जोडले म्हणजे दुह्मह्+ए =दुह्महे, भवामह्+ए =भवामहे ही आत्मनेपदी रूपे बनतात. परस्मायक रूपाना इ हे स्वत्वदर्शक सर्वनाम जोडले म्हणजे अदुह्म (ह्) + इ = अदुह्महि, अभवाम (इ) + इ = अभवामहि ही आत्मनायक रूपे येतात. आत्मनायक रूपांपैकी एक रूप विचारात घेण्यासारखे आहे. ते रूप चयस्महे हे होय. चि ह्न चय् धातूचे लट्च्या उत्तमपुरुषाच्या अनेकवचनाचे हे रूप आहे. सामान्य धर्तीने पहाता चयामहे असे रूप व्हावे. चय्+अ+अ+हम् +अह+ ए = चयामहे. ह् व स् हे उच्चार एकमेकांच्या बदला येणारे आहेत. सबब, ह्म च्या स्थानी स्म् घालून व एक अ कमी करून चय्+अ+स्म्+अह्+ए = चयस्महे असे रूप लाभते. अ म्हणजे हा, स्म् म्हणजे मी, अस् किंवा अह् म्हणजे तो. ए हे आत्मत्वदर्शक सर्वनाम, चयस्महे म्हणजे हा, मी व तो असे आम्ही तिघे खास गोळा करतो. हम् प्रमाणेच स्म्चाही उपयोग प्राथमिक भाषा करी, हे दाखविण्याला चयस्महे हे रूप अथर्ववेदांत सुदैवाने राहिले आहे. इतर लकारांतील उत्तमपुरुष बहुवचनाची रूपे सहज उकलता येण्यासारखी आहेत, करता तपशिलात शिरत नाही.