Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
मध्यमपुरुषत्रिवचनाची रचना येणेप्रमाणे होते. पा+त्+त्व्+अ=पाथ+अ=पाथ; म्हणजे तो, तू व हा असे तिघे रक्षिता. भव्+अ+त्+त्व्+अ=भवथ; म्हणजे हा, तो तू व हा असे चौघे होता. कल्पय्+अ+त्+त्व्+अ+अ=कल्पयथा; म्हणजे हा, तो तू व हा असे तुम्ही पाच जण रक्षिता, भव् + अ + त् + त्व् + अन् + अ =भवथन; म्हणजे हा, तो तू, दुसरा आणि हा असे तुम्ही पाच जण रक्षिता. (अन् चा अर्थ बहुत असा धरिला तर) असे तुम्ही बहुत जण रक्षिता. अ+बिभृ+त्व्+अ+अ=अबिभृत, म्हणजे तू, हा आणि हा असे तुम्ही तिघे भरता. येथे शेवटल्या अचा पूर्वरूप संधी झाला आहे. अ+ बिभृ+त्व्+ अन्+अ=अ विभृतन; म्हणजे तू, दुसरे व हा असे तुम्ही बहुत जण भरता. अ+भव्+अ+त्व+अ=अभवत; म्हणजे हा तू व हा असे तुम्ही तिघे होते.
जग्म्+त्व्+अ+अ+= जग्म्+स्+अ+अ= जग्म् +ह्+अ+अ = जग्म्+अ+अ+अ=जग्म; म्हणजे तू, हा व हा असे तुम्ही तिघे जाता. येथे शेवटील दोन्ही अ चा पहिल्या अ शी पूर्वरूप संधी झाला आहे. ब्रू+त्+त्+ त्व्+ए = ब्रू + ध्व् + ए = ब्रूव्वे; म्हणजे तो, तो, तू, असे तुम्ही खास तिघे स्वत: बोलता. भव् + अ + त् + त् + ध्व् + ए = भव + व्व् + ए = भवध्वे; म्हणजे हा, तो, तो व तू असे तुम्ही चौघे स्वत: होता. अ + ब्रू + तू + त् + त्व + अम्=अब्रू + ध्व्+अम्=अब्रूध्वम्; म्हणजे तो, तो, तू व हा असे तुम्ही चौघे बोलता. अ+भव्+अ+त्+त्+व्+अम्=अभव+ ध्व्+अम्=अभवध्वम्; म्हणजे हा, तो, तो, तू व हा असे तुम्ही पाच जण स्वत: बोलता. ब्रू+त्+त्+त्व्+अम्=ब्रू + ध्व्+अम् =ब्रूध्वम्.भव्+त्+त्+त्व्+अम्=भवध्वम्.यज्+अ+त्+त्+त्व्+अ=यज+ध्व+अ =यजध्व; म्हणजे हा, तो , तो व तू असे तुम्ही चौघे स्वत: यज्ञ करता अम् च्या स्थानीं अ सर्वनाम योजिलें आहे, इतकेच. दुसरे कोणतेही दर्शक सर्वनाम योजिले असते तरी आश्चर्य मानावयास न लगे.वारय्+अ+त्+त्+त्व्+अ+अत्=वारय+ध्व्+आत्= वारयध्वात्; म्हणजे हा, तो, तो, तू व हा असे तुम्ही पाच जण स्वत: वारता. येथे अम् किंवा अ हे सर्वनाम न योजिता शेवटी अत् सर्वनाम योजिले आहे. कल्पय् +अ+त्व्+अ+अ= कल्पय+ता = कल्पयत; म्हणजे हा, तू व हा असे तुम्ही खास तिघे कल्पिता. कल्पयत या रूपात अंत्य अ चा पूर्वरूप संधी केला आहे व कल्पयता या रूपात परिपाठांतला आ संधी केला आहे.