Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
११) आ किंवा अ ह्न हा आज्ञादर्शक उद्गार लेट् च्या प्रथमपुरुष रचनेत येतो. येणेप्रमाणे प्रथमपुरुषरूपरचनेत वरील नऊ सर्वनामे, एक संख्यावाचक शब्द व एक उद्गार कार्य कसे करतात, ते येथपर्यंत पृथक्कारले. आता कित्येक चमत्कारिक दिसणारी प्रथमपुरुषाची वैदिक धातुरूपे घेऊन त्यात हे शब्द कसे योजले आहेत ते मासल्याकरता दाखवितो.
१) दुहाम् ( व शयाम्) = दुह् + आ + अम्. आ हा आज्ञादर्शक उद्गार व अम् म्हणजे तो. दुहाम् म्हणजे तो दूध काढो. शयाम् म्हणजे तो निजो.
२) दुहाम् = दुह् + र् + आ + अम्. ते तिघे दूध काढोत.
३) दुहे् = दुह् + र् + ए = हे तिघे दूध काढतात.
दुह्ते = दुह् + र् + त् + ए ह्न ते हे तिघे दूध काढतात.
दुह्ते = दुह् + अ+ त्+ ए = हा तो व हा असे तिघे दूध काढतात
(किंवा र् चा अ होऊन) ते हे तिघे दूध काढतात.
४) दुहे् = दुह् + ए ह्न हा दूध काढतो.
दुग्धे = दुह् + त् + ए ह्न तो हा दूध काढतो.
शये = शय् + ए ह्न हा निजतो.
५) गच्छतात् = गच्छ् + अत्+आ+अत् ह्न तो तो जावो.
गच्छतु = गच्छ् +अत्+उ ह्न तो तो जावो.
विशतात् = विश्+अत् + आ +अत् ह्न तो तो शिरो.
पप्रा = पप्रा +अ ह्न तो भरतो be fills.
अदुह = अ + दुह् + अ ह्न हा दूध काढी.
६) अदुह्न् = अदुह् + अन ह्न ते दूध काढीत.
अदुह्न् = अदुह् + र् + अन् ह्न ते तिघे दूध काढीत.
अदुह् : अदुह् + स्+स्+स् = तो, तो आणि तो (असे तिघे दूध काढीत.)
अदुह् = अदुह् + र् + अ ह्न हे तिघे दूध काढीत.
७) आस् (आस्त्) = अ + अस्+त् = तो होता.
आसौत् = अ +अस्+ई+त् ह्न हा तो होता.
८) अकारि =अ + कार +इ ह्न हे ह्न हाह्न ही करविले (प्रयोजक) जाते.
यासरणीने वैदिक व पाणिनीय संस्कृतातील प्रथम पुरुषरूपरचनेतील ककोणतेही रूप सहज पृथक्कारता येईल, सबब विस्तार करीत नाही.