Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
६६ क्रियाशब्दांना सर्वनामे जोडून जशी क्रियाशब्दाची वचने बनत, तशीच नामशब्दांना व सर्वनामशब्दांना सर्वनामे जोडून नामशब्दांची वचने बनत. देव शब्दापुढे स् हे सर्वनाम येऊन देवस् किंवा देवह् ऊर्फ देव: हे रूप होई व त्याचा अर्थ तो देव असा असे. देव शब्दापुढे अ व उ ही दोन सर्वनामे येऊन देव +अ+उ=देवा+उ=देवौ हे रूप बने. देव शब्दापुढे अ व अ ही सर्वनामे येऊन देव +अ+अ=देवा हें रूप बने. देवा म्हणजे हा व हा असे दोन देव आणि देवौ म्हणजे हा आणि तो असे दोन देव. देव शब्दापुढे अ, स्, व अस् ही तीन सर्वनामे येऊन देव+अ + स् +अस् = देवासस् हे रूप होते. देव +अ+स्+स्= देवास्= देवा: असे रूप होते. देव +अ+इ +इ किंवा देव +अ+अ + ई किंवा देव+इ+इ+इ= देवे असे रूप होते. देव +अन्=देवान् असे रूप होते. देवास: म्हणजे हा तो व तो असे तीन देव. देवा म्हणजे हा, तो व तो असे तीन देव. देवे म्हणजे हा, हा व हा असे तीन देव आणि देवान् म्हणजे अनेक, बहुत देव. हरि + स्= हरि: म्हणजे तो हरि. हरि + इ+इ = हरी म्हणजे हा व हा असे दोन हरि. हरि + अ + स् + हर्य: (उलगडून) हरय: म्हणजे हा, तो व तो असे तीन हरि. रमा + अ= रमा म्हणजे ती रमा. रमा + अ+इ =रमे म्हणजे ही व ही अशा दोन रमा. रमा + स्+ स्+ स् किंवा रमा + अ+ अ + स् = रमा: म्हणजे ती, ती, ती अथवा ही, ही व ती अशा तीन रमा. अभिजित् + त् किंवा स् = अभिजित्. अभिजित् + अ + उ = अभिजितौ. अभिजित् + अ + स् + स् = अभिजित:. नदी + इ = नदी म्हणजे ही नदी. नदी +अ+उ = नद्यौ म्हणजे ही व ती अश्या दोन नद्या. नदी+ स्+ स्+ स् = नदी: म्हणजे ती, तीं, ती अश्या तीन नद्या. नदी + अ+ स्+स् = नद्य: म्हणजे ही ती व ती अशा तीन नद्या. शा + स्= स: म्हणजे तो तो. त्+अ+उ = तौ म्हणजे हा व तो असे दोन ते. त्+अ+अ=ता म्हणजे हा व हा असे दोन ते. त्+अ+इ+इ किंवा त्+अ+इ+इ किंवा त् + अ + अ + इ = ते म्हणजे हा व हा व हा असे ती ते. अस (अ+स्+अ) + उ= असौ म्हणजे हा हा. अमु (अम्+उ) उ + उ = अमू म्हणजे हा व हा असे दोन हे. अम्+उ+उ= अमू म्हणजे हा व हा असे दोन हे. अम्+इ+इ+इ= अमी म्हणजे हा, हा व हा असे तीन हे. अय्+अम्+अयम् म्हणजे तो हा. इम+अ+उ = इमौ म्हणजे हा व तो असे दोघे हे. इम+ इ+इ+इ किंवा इम + अ+इ+इ = इमे म्हणजे हा व हा व हा असे तिघे हे. इय्+अम्= इयम् म्हणजे ही ही. इमा+अ+इ= इमे म्हणजे ही व ही अशा दोघी क्या. इमा+अ+स् = इमा: म्हणजे ही व ही व ती अश्या तिघी या. इयम् या रूपात इ हे सर्वनाम स्त्रीलिंगी योजिलेले प्रथम दिसते. तसे च, इमे, इमा:, या रूपात इम. हे आकारान्त सर्वनाम स्त्रीलिंगी योजिलेले प्रथम दिसते. इमा हे जोड सर्वनाम इम् व आ या दोन सर्वनामांचा जोड आहे. पैकी आ हे सर्वनाम स्त्रीलिंग योजिलेले आहे. आभि:, आसाम्, आसु या विभक्तिरूपात हे स्त्रीलिंगी आ रूप आलेले आहे. इ व आ ही दोन सर्वनामे स्त्रीलिंगी समजण्याचा हा प्रारंभ होय. सा + अ = सा म्हणजे ही ती. ता + अ + इ किंवा ता + इ + इ= ते म्हणजे ही व ही अशा दोघी त्या. ता + अ+ अ + स् = ता: म्हणजे ही व ही व ती अशा तिघी त्या. असा + उ = असौ म्हणजे ही ही. अमू + उ+ उ + स् = अमू: म्हणजे ही व ही व ती अशा तिघी या. अमतील दीर्घ ऊ स्त्रीलिंगी समजण्याचा हा प्रारंभ आहे. त् + अत् = तत् म्हणजे ते ते. त् + अ + इ = ते म्हणजे हे व हे अशी दोन ही त् + अ+ अन्+ इ= तानि म्हणजे हे, दुसरे व हे अशी तीन ही. त् + अ+अ+अ = ता म्हणजे हे व हे व हे अशी तीनही, नामशब्द व सर्वनामशब्द यांची वचनरूपे क्रियाशब्दांच्या वचनरूपांच्या धर्तीवर चालतात, हे वरील उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. वरील उदाहरणात नामांचा व सर्वनामांचा केवळ उदाहरणाकरता म्हणून अत्यंत त्रोटक उल्लेख केला. परंतु नामे व सर्वनामे यांच्या वचनांचा विचार अत्यंत महत्वाचा असल्यामुळे तो येथे साद्यन्त देतो. प्रथम पृथकरणार्थ सर्वनामे घेतो. मधु ( प्र. ए.) मधुँ + इ+ इ = मधुनी मधुँ + उ + उ+इ = मथुनि. हरिँ + इ+ इ = हरिणी. हरिँ + इ+इ+इ = हरीणि मधुमत् + इ+इ = मधुमती. मधुमत् + न् + इ= मधुमन्ति.