Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
६२ सर्व लकारातील प्रथमपुरुषाच्या रूपांची आत्मनायक व परस्मायक रचना तिन्ही वचनात कोणकोणती सर्वनामे लागून कसकशी होते ते सांगितले. आता या सर्वनामांचे परिसंख्यान करू व या सर्वनामांचे अवशेष वैदिकभाषेत कितपत राहिले आहेत ते पाहू.
प्रथमपुरुषरचनेत खालील सर्वनामे येतात ह्न १) अ, २) इ, ३) उ, ४) त्, ५) ए (अ +ए), ६) अत् (अ+त्), ७) अस् (अ+स्), ८) उस् (उ+स्), ९) अन्, १०) अम्; तसेच खालील संख्याशब्द येतात: ह्न इर; र् व रिर्; व खालील उद्गार लेट् मध्ये येतो : आ किंवा अ ह्न या सर्वनामासंबंधाने, संख्याशब्दांसंबंधाने व उद्गारांसंबंधाने विशेष माहिती प्रत्येकी येणेप्रमाणे :
१) अ : या सर्वनामाचा अर्थ जवळचा किंवा दूरचा 'हा' असा दुहेरी आहे. हे सर्वनाम त् सर्वनामाला पुढे किंवा मागे जोडून येते व इ सर्वनामाला फक्त मागे जोडून येते. अ+त=अत्. त् + अ=त. अ+इ = ए. त् सर्वनामाच्यापुढे जेव्हा अ सर्वनाम येते तेव्हा त्याचा अर्थ खास असा असतो व इ सर्वनामाच्या मागे जेव्हा अ सर्वनाम येते तेव्हा त्याचाही अर्थ खास असा असतो. अभवत् म्हणजे तो झाला व अभवत म्हणजे तो खास झाला. भवति म्हणजे तो आहे व भवते म्हणजे तो खास आहे. हे अ सर्वनाम अस्मै, अस्मात्, अस्य, अस्मिन्, अस्यै, अस्या:, अस्याम्, आभ्याम् या वैदिकरूपात राहिले आहे. इदम् सर्व नामाच्या बदला ज्याअर्थी अ सर्वनाम येते त्याअर्थी इदम् चा जो सन्निकृष्ट पदार्थ हा अर्थ तोच अ या सर्वनामाचा आहे, हे स्पष्ट होते. त् सर्वनामाच्या पुढे जसे अ सर्वनाम येते तसेच ते एत्, एष्, एन्, अन्, अम् याही सर्वनामांच्या पुढे येऊन एत, एष, एन, अन व अम अशी जोड अंगे बनविते. द्विरूक्ती होऊन अ + अ = आ असाही जोड ब्रुवाताम्, अब्रुवाताम्, ब्रुवाते इत्यादी रूपात दिसतो.
२) इ : या सर्वनामाचा अर्थ हा असा आहे. हे सर्वनाम त् सर्वनामाच्या पुढेही येते व मागेही येते. इ+त् = इत्. त् + इ= ति. अ सर्वनामाच्यापुढे इ सर्वनाम येऊन ए हे जोड सर्वनाम होते. द्विरूक्ती होऊन इ+इ=ई असाही जोड होतो, ई हे जोड सर्वनाम बोभवीति (बोभव्+ई+त्+इ) ब्रवीति, आसौत्, अकार्षीत् इत्यादी रूपात आढळते.
३) उ, उस् : या सर्वनामाचा अर्थ तो असा आहे. भवतु (भव्+अत्+उ) भवन्तु (भव्+अन्+त+उ) या अज्ञार्थक रूपात हे सर्वनाम आढळते. अम् सर्वनामाच्या पुढे येऊन अमु असा जोड होतो. अमु चा अर्थ हा तो. बभूवथूस व वभृवतुस् या लिट्च्या रूपात उस् हे सर्वनाम आढळते.