Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

६१ भवति, भवते भवतस्, भवेते, भवंति, भवन्ते; अभवत्; अभवत; अभवताम्, अभवेताम्; अभवन्, अभवन्त; भवतु, भवताम्; भवेयु:, भवेरन्; भवाति ह्न भवात्, भवातै; भवातस्, भवैते; भवान्, भवान्ते; बभूव, बभूवे; बभूवतुस्, बभूवाते; बभूवुस, बभूविरे; अभूत, अभूयत या रूपाचे येथपर्यंत जे पृथक्करण केले त्यावरून प्रथमपुरुषी कर्त्याचे एकत्व, दित्व व त्रित्व किंवा बहुत्व कसे साधले जात असे ते कळून आले. आता या रूपात आत्मनेपदत्व व परस्मैपदत्व कसे दाखविले जाई त्याचा उलगडा करतो. भवति हे रूप मुळात भव्+अ+त्+ इ असे होते व भवते हे रूप भव्+अ+त्+ ए असे होते. भव्, अ, व त्, हे तीन शब्द दोन्ही रूपात सामान्य आहेत. फरक काय तो इ व ए या शब्दात आहे. पैकी ए हा शब्द अ + इ या दोन सर्वनामांचा जोड आहे. इ म्हणजे हा आणि अ + इ म्हणजे जवळचा खास हा. अ या सर्वनामाचे सापेक्षत्वाने जवळचा व दूरचा असे दोन अर्थ होतात म्हणून सुवंत प्रक्रियेत सांगितलेच आहे. अ + इ = ए या जोड सर्वनामांत अ सर्वनामाचा अर्थ जवळचा खास असा आहे. भवति या रूपातील ति = त् + इ चा अर्थ हा तो असा आहे आणि भवते या रूपातील ते= त् + अ+इ चा अर्थ जवळचा खास तो असा आहे. भवति यातल्यापेक्षा भवते त सामीप्यदर्शक किंवा आत्मत्वदर्शक अ सर्वनाम जास्त आहे. त्यामुळे भवते चा अर्थ तो फक्त स्वत: होतो असा आहे आणि भवति चा अर्थ तो दुसऱ्या करिताही होतो असा आहे. भवतस् व भवेते यातील भेदही असाच आहे. भव्+अ+त्+अस् = भवतस्. त् म्हणजे दुरचा तो व अस् म्हणजेही दूरचा तो ह्न भवतस् म्हणजे दूरचे ते दोघे होतात. भव्+अ+इ+त्+अ+इ= भवेते, अ+ इ म्हणजे जवळचा हा व त्+अ+इ म्हणजे जवळचा तो हा, मिळून एते म्हणजे जवळचे ते दोघे स्वत: खास. भवंति व भवन्ते यातील भेद भवति ह्न भवतेतल्या भेदासारखा आहे. अभवत् व अभवत या दोन रूपातील दुसऱ्या रूपात अ सर्वनाम जास्त आहे व तेच आत्मनायकत्वाचे दर्शक आहे. अभवताम् व अभवेताम् यातील दुसऱ्या रूपात आत्मनायकत्वदर्शक इ हे सर्वनाम जास्त आहे. अभवन् व अभवन्त यातील दुसऱ्या रूपात आत्मनायकत्वदर्शक अ हे सर्वनाम शेवटी जास्त आहे. बाकीच्या जोड्यातीलही भेद याच धर्तींवर उकलता येतो. भव् + अ + त्+ उ = भवतु, अत् म्हणजे तो व उ म्हणजे तो. अतु म्हणजे तो तो. भव्+ अत्+ अ+ अम् = भवताम्. अत् म्हणजे तो व अ + अम् म्हणजे खास तो. अताम् म्हणजे खास तो तो. भव् + आ + अत् = भवात्. आ ही लेट् ची खूण आहे व त्याचा अर्थ आज्ञा हुकूम असा आहे. अत् म्हणजे तो. भवात् म्हणजे तो होवो. भव् + आ + अत्+ इ= भवाति. भवाति म्हणजे तो हा होवो. भव् + आ+ अत् + अ+इ = भवातै. भवातै म्हणजे तो हा खास होवो. भवात् म्हणजे कोणीतरी अतिदूरचा अनिश्चित माणूस होवो. भवाति म्हणजे किंचित अलीकडील कोणी माणूस होवो आणि भवातै म्हणजे साक्षात् सन्निकटवर्ती हा खास माणूस होवो. बभूव म्हणजे तो आहे आणि बभूवे (बभृव +अ+इ) म्हणजे तो हा खास आहे. बभृवतु: (बभूव + अत्+ उस्) म्हणजे ते दोघे आहेत आणि बभूवाते (बभूव्+अ+अत्+अ+इ) म्हणजे ते दोघे खास आहेत. बभूवु: (बभूव्+उस्+स्+स्) 

म्हणजे ते तिघे आहेत आणि बभूविरे (बभूव +इर्+अ+इ) म्हणजे ते तिघे खास आहेत. ददौ (ददा + उ) म्हणजे तो देतो. ददतु (दद्+अत्+ उस्) तो व तो असे ते दोघे देतात. ददुस् (दद्+उ+स्+स्) तो व तो व तो असे ते तिघे देतात.