Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
७२ एणेप्रमाणे पाणिनीच्या वेळेस ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र यांची सामाजिक स्थिती काय होती व यांची भाषा कोणती होती हे सांगितले. आता या दोन बाबीत गेल्या अडीच तीन हजार वर्षांत म्हणजे पाणिनीने नंतरच्या काळात कोणकोणते फरक होत गेले ते सांगावयाचे. एथपर्यंत दिलेल्या तपशिलात आपणाला असे समजून आले की, ब्राह्मणक्षत्रियवैश्यांचे त्रैवर्ण्य गुण्यागोविंदाने नांदत असून ते संस्कृत भाषा बोलत आहे आणि क्षुद्रवर्ण आर्यभाषा व आर्यसंस्कृती अत्यंत मंदपणाने शिकत असून त्याला त्रैवर्णिकांच्या बरोबरीचे व्हावयाला अद्याप पुष्कळ अवकाश आहे. पाणिनीच्या नंतरच्या काळात ह्या स्थितीत कोणकोणते फरक कोणत्या कोणत्या कारणांनी झाले ते आता नमूद करतो.
७३. प्रत्यभिवादेऽक्षुद्रे (८-२-८३) असे पाणिनीय सूत्र आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या सर्वांचा गुरू ब्राह्मण. गुरु भेटले असता, त्यांना अभिवादन करावयाची चाल पाणिनीकाली असे. शिष्याचे अभिवादन केले म्हणजे गुरू उलट प्रत्यभिवादन करीत. ह्या प्रत्यभिवादनासंबंधाने पाणिनी सांगतो की प्रत्यभिवादन करिताना गुरूने जे वाक्य उच्चारावयाचे त्या वाक्यातील अंत्य स्वर, अभिवादक जर ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य या त्रैवर्णिकांपैकी स्त्रीपुरुष कोणी असेल तर, प्लुत उच्चारावा आणि अभिवादक जर क्षुद्रांपैकी स्त्रीपुरुष असेल तर प्रत्यभिवादवाक्यातील अंत्य स्वर प्लुत उच्चारू नये. उदाहरणार्थ, गुरू भेटले असता कोणी ब्राह्मणशिष्य म्हणतो, अभिवादये देवदत्तोऽहम्. त्याला गुरू प्रत्यभिवादन करतात की, भो: आयुष्मान् एधि देवदत्ता. अभिवादन करणारी ब्राह्मण स्त्री असेल तर ती, अभिवाद्ये गार्गी अहं, असे म्हणे व गुरू तिचे प्रत्यभिवादन, भो: आयुष्मती एधि गार्गी, असे करीत. हाच न्याय क्षत्रिय स्त्रीपुरुषांना लागू असे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य अशा स्त्रीपुरुष अभिवादकांचा तक्ताच देतो, म्हणजे पाणिनीकाली अभिवादप्रत्यभिवाद कसा करीत ते थोडक्यात लक्षात येईल.
१
अभिवादक शिष्य प्रत्यभिवादक गुरू
ब्राह्मणपुरुष:- अभिवादये देवदत्तोऽहम्
ब्राह्मणस्त्री:- अभिवादये गार्गी अहम्
क्षत्रियपुरुष:- अभिवादये युधिष्ठिरोऽहम्
क्षत्रियस्त्री:- अभिवादये अनसूयाऽहम्
वैश्यपुरुष:- अभिवादये इंद्रगुप्तोऽहम्
वैश्यस्त्री:- अभिवादये गोपालिताऽहम्
२
भो: आयुष्मान एधि देवदत्ता ३
भो: आयुष्मती भव गार्गी ३
भो: आयुष्मान एधि युधिष्ठिरा ३
भो: आयुष्मती भव अनसूया ३ इ
भो: आयुष्मान भव इंद्रगुप्ता ३
भो: आयुष्मती एधि गोपालिता ३
इ
परंतु अभिवादक जर क्षुद्र स्त्री किंवा पुरुष असेल तर प्रयोग असा होई.
क्षुद्रपुरुष:- अभिवादये तुषजकोऽहम् कुशल्यसि तुषजक
क्षुद्रस्त्री:- अभिवादये तुषजिकाऽहम् कुशलिन्यसि तुषजिके