Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
७०. ह्या पाणिनीय समाजस्थितीत एक बाब उत्कटत्वाने भासमान होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अनिरवसित क्षुद्र व निरवसित क्षुद्र या चारी वर्णासंबंधाने पाणिनी काही ना काहीतरी सांगतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र हे वर्ण एकमेकात गौण शरीरसंबंध करीत, हेही तो लिहितो. परंतु या गौण शरीरसंबंधापासून जी प्रजा होई तिच्या संबंधाने किंवा तिच्या नावासंबंधाने चकार शब्दही काढीत नाही. अंबष्ठ, करण, उग्र, मागध, माहिष्य, क्षतृ, वैदेहक, रथकार, निषाद, पारशव, चंडाल इत्यादी अनुलो प्रतिलो संकर जे याज्ञवल्क्याने आपल्या स्मृतीत वर्णिलेले आहेत किंवा नट, करण, झल्ल, मल्ल, निच्छिवि, खस, द्रविड व्रात्य जे मनूने सांगितलेले आहेत त्यांचा बिलकूल उल्लेख पाणिनीयात नाही. अंबष्ठ, करण, मागध, माहिष्य, क्षत्तृ, वैदेहक, निषाद इत्यादी शब्दांच्या साधनिका अष्टाध्यायीत आलेल्या आहेत. परंतु त्यापैकी एकाही शब्दाचा अर्थ संकरजाति किंवा संकरव्यक्ति नाही. उदाहरणार्थ ८ह्न३ह्न९७ या सूत्रात अंबा+स्थ= अंबष्ठ अशी अंबष्ठ शब्दाची साधनिका देऊन त्यापासून ४ह्न१ह्न१७१ या सूत्राने आंबष्ठय: हा तद्धितशब्द पाणिनी साधतो, परंतु तो तद्धित किंवा मूळ अंबष्ठ शब्द संकरवाची आहे असे सांगत नाही, आंबष्ठ्य शब्द अपत्यवाचक व अंबष्ठ शब्द देशवाचक आहे असे सांगतो. मगध शब्दापासून मागध हा अपत्यवाचक शब्द पाणिनी देतो (४ह्न१ह्न१७०) व तो तद्राजार्थक आहे हेही सांगतो, परंतु संकरजातिवाचक तो शब्द आहे असे बोलत नाही. धूमादिगणात विदेह शब्द आहे, त्याला वुञ् प्रत्यय लागून वैदेहक हा तद्धित होतो, परंतु त्याचा अर्थ संकरजाति नाही (४ह्न२ह्न१२७). श्रत्तृ शब्द ६ह्न४ह्न११ या सूत्रात पठित आहे, परंतु त्याचा अर्थ सारांशक एवढाच आहे, संकरजाति नाही. महिष्या धर्म्यं माहिषं, महिष्यां साधु माहिष्यं, माहिषिक इत्यादी तद्धित पाणिनी नमूद करतो, परंतु क्षत्रियापासून वैश्येच्या ठायी झालेल्या संकराचे नाव माहिष्य आहे हे तो नमूद करीत नाही. ह्या संकरजाति जर पाणिनीला माहीत असत्या, तर हे शब्द संकरजातिवाचक आहेत हे सांगितल्यावाचून तो रहाता ना. पाणिनी पराकाष्ठेचा आस्थेवाईक वैयाकरण आहे. भाषेच्या बारीकसारीक लकबा देखील तो सांगण्यास विसरत नाही. असे असताना, ज्याअर्थी क्षत्तृ, मागध, करण, वैदेहक, माहिष्य, अंबष्ठ इत्यादी शब्द संकरजातिवाचक आहेत हे तो सांगत नाही, त्याअर्थी एकच अनुमान या अनुपलब्धीपासून काढणे शक्य आहे की पाणिनीच्या काळी संकरजाति हा सामाजिक वर्ग स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेला नव्हता. पाणिनीकाली वस्तुस्थितीच अशी होती की ब्राह्मणापासून शूद्रीच्या, क्षत्रियीच्या किंवा अर्यीच्या ठायी झालेल्या संततीला निंद्य समजत नसत, गौण समजत इतकेच. पाणिनीपूर्वकाली म्हणजे आर्षकाली तर ब्राह्मण व क्षुद्री यांच्यापासून झालेल्या संततीला, निंद्य तर राहू द्याच पण गौणही समजत नसून, पूर्ण ब्राह्मण समजत. आर्षकाल व पाणिनीकाल यात एतत्संबंधाने भेद एवढाच की, पाणिनीकाली वर्णावर्णातील शरीरसंबंध फक्त गौण समजला जाऊ लागला होता. पाणिनीच्या नंतर वर्णबाह्य शरीरसंबंध केव्हा निंद्य समजला जाऊ लागला त्याविषयी उल्लेख पुढे यथास्थली येईल. संकरांसंबंधाने जसा उल्लेख पाणिनीयात नाही, तसाच मनूने वर्णिलेल्या नट, करण, झल्ल, मल्ल, निच्छिवि, खस, द्रविड वगैरे व्रात्यासंबंधानेही व्रात्य
म्हणून उल्लेख त्यात बिलकूल नाही.