Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[१६७]                                        ।। श्री ।।                १५ मार्च १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. तिकडे अबदालीची गडबड जाहाली. यास्तव लौकर फौजा २४५याव्या. त्यास मोगलावर जरब बसून मोगलांचा कारभार निर्गमांत आला. जागिरीत अम्मल बसला. कोठें कोंठे बसणें त्याचा गुंता नाहीं. ब-हाणपूरांत अम्मल जाहाला. शहर हवालीं जाहलें. एक दोन स्थळें हवालीं होणें तीं होतील. इकडील मोंगलांची गरमी राहिली नाहीच. भागानगराकडे जातील. त्यास चिरंजीव राजश्री दादांनी यावें, परंतु तीर्थरूपांची आज्ञा आह्मींच जावें ही जाहाली. त्यांजवरून छ २५२४६ रजबीं हिंदुस्थानांत यावयास निराळे जाहालों. चिरंजीव राजश्री विश्वासराव बरोबर आहेत. त्यास, अबदालीकडील खबर वरचेवर कळली पाहिजे. तुमच्या तालुकियाचा बंदोबस्त कसा आहे तें सर्व लिहिणें. मल्हारबा, जनकोजी शिंदे यांजकडील बातमी जलदीनें येत नाहीं. तरी तेथें कोण्ही ठेऊन तिकडील बातमी जलदीनें पाठवीत जाणें. सुजाअतदौला सर्व प्रकारें स्नेह राखितात. सरदारांनी२४७ व चिरंजीवांनीं त्यांचे ठायीं ममतेंत अंतर केलें नाहीं. या दिवसांत त्यांणीं सरदाराचे विचारें अबदालीचें पारिपत्य करावें, हेंच त्यास उचित आहे. त्यांणीं अबदालीस सामील होणें; अबदालीची नड हिंदुस्थानचे पातशाहींत रुतों देणें हें अयोग्य! याचा विचार काय केला असे ? पुढें मातबर फौजेनसी मजलदरमजल खासा स्वारी जलदीनें येऊन पोहोचेल. तरी याचा विचार लिहिणें. व त्याजकडील कोण्ही इतबारी मातबर वकील हुजूर यावा हें जरूर व्हावें. लिहिल्याअन्वयें तरतूदहि व्हावी. तुह्माकडील दोन तीन सालाचे२४८ हिशेबाचे झाडे तयार असावे. व यंदा अबदालीचे गडबडीमुळें रुपया प्रथम मिळणें लांब आहे. त्यास, खर्चास रुपयाची तरतूद जाहाली पाहिजे. बाकी२४९ किंवा साल मजकुरचा ऐवज, कांहीं पुढील ऐवजपैकीं याप्रमाणें, वीस लाख रुपयेपर्यंत तरतूद करून माळव्यांत पोहचतांच ऐवज कांहीं येई, कांही पुढें येऊन पोहोचते, हे जरूर करणें. हिंदुपत वगैरे रजवाडे आपले फौजेनसी सामील व्हावे. पारचे२५० रजपूत पूर्ते तुमचे लगाचे असतील. ते मातबर आल्यास उपयोगी असेहि यावयास सिद्ध करावें. मागून लिहिलें ज्या रोखें घेऊन यावें असें लेहून पाठवूं त्या रोखें आणावे. मुख्य गोष्ट बातमी फार जलद चांगली जलद पोंहोचविणें. पैकियाची तरतूद जरूर करणें. + जाणिजे. अबदाली जयनगर पलीकडे आहे. तेव्हां तुमचे तालुकियांत फार पेंच नाहीं. बारीक, लबाडी कोणी करील तर तुह्मी गेला२५१ आहां, नीट कराल. अबदालीचें पारपत्य होणें हें आदि आहे. बातमी व ऐवजाची तरतूद लिहिलेप्रमाणें येऊन पावेसें करणें. सुजादौला तूर्त मेळवून घेतले पाहिजेत. न मिळाले तर निमित्तास जागा आहे. तिकडील राजकारणें चार असतील तींहि राखून ठेवावीं. फार फार२५२ कामें करून दाखवावीं हे तुमची उमेद. त्याप्रमाणें करणें. कराल हा भरंवसा आहे. र॥ छ २६ रजब. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
पे॥ छ २७ साबान.