Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

त्याजकडील चंडोल अगदीं बुडविला. दहा अकरा हत्ती, पंधरा पावेतों तोफा आणिल्या. त्याजकडील याजखेरीज सात आठ मातबर सरदार मारिले गेले, गाडदी प्यादे यांस नीत नाही. याजप्रमाणें आह्मांकडील पांच सातजण केशवराव पानसी तोफखानेयाचे दरोगे, याजप्रमाणें पांच सात ठार. शंभर दीडशें राऊत तीन चारशे पावतो जखमी. याजप्रमाणें जालें. त्याजवर मोंगल तेथें राहिला. बरा नाही. आंत जखमी बहुत. मातबर चार असामी होत्या त्या मारिल्या गेल्या. यांजमुळें दहशत मोगलानें फार खादिली. उपाय नाहीं. आतां जर हे आपणांवर चालोन येतील आपणांस बुडवितील यांत गुंता नाहीं. याजप्रमाणें अंधेशा पुरता चित्तीं आणऊन सल्ल्यावर घातलें, मोगलानें. त्याजवर त्यांनी त्यास जागा मनास येईल त्याप्रमाणें किल्ले जागा मागितली. त्याजवर त्याणें यास बजित फार येऊन दिली. साठी लाखाची२४१ जागा स्वदेशी अंबेड, पुलंबारी, नांदेड याजप्रमाणें खास जागीर द्यावी; किल्ले दोन, आसेरी, दवलताबाज, शहरें दोन, विजापूर, बराणपूर, याजप्रमाणें घेऊन सलुख झाला. दवलताबाजेस र॥ गोपाळराव गोविंद गेले. आसेरीस रा० बच्याजी विश्वनाथ बरवे; विजापुरास नागोराम वामोरीस असतात ते; असे रवाना झाले. किल्ले हस्तगत झाले ह्मणजे मोगलानें कूच करावे. जेथें आहे तेथून निजामअल्ली याणें आलजपुरास जावें. जागा खाऊन असावें. सलाबतजंग यांणी भागानगरीं असावें. मराठे निंबाळकर यांणी त्याजकडे जाऊं नये चाकरीस. याजप्रमाणें करार झाला. काही मोगलाची मोकळी मात्र झाली. आपली फौज ज्याप्रमाणें आहेत भोंवतालीं त्याप्रमाणें आहेत. मोठा नक्ष झाला. श्रीमंत नानासाहेब यांचे ताले शिकंदर आहेत. ज्याकडे वाईट नजरेनें पाहतील त्याचें चूर्ण होईल. याजप्रमाणें मोगलानें दिलें. आतां मोगलामध्यें होशा तिलतुल्य राहिला नाहीं. जहागीर कोणती घेतली त्याची याद आली नाहीं. मागाहून सविस्तर लिहून पाठवितों. नगरहून श्रीमंत नानासाहेब कूच करून गंगातीरास पैठणास फाल्गुन शुद्ध प्रतिपदेस जाणार. तिकडून श्रीमंत भाऊसाहेब येणार. गंगातीरास आलिया यांची त्यांची भेट सत्वरच होईल. भेट जाल्याउपरि श्रीमंत दादासाहेबाची रवानगी सत्वर तिकडे करणार यांत गुंता नाहीं. तूर्त फिकीर तिकडील यजमानास लागली आहे. पत्रें आलीं, वर्तमान कळल्या संतोष आहे. हबसी याजकडील उंदेरी घेतली. कासे यास आरमार लागली. तेहि सत्वर फडशांत गोष्ट आहे. मोगलाचा रेच उतरल्यानें सर्वांचा माज मोडिला यांत गुंता नाहीं. वरकड वर्तमान मागाहून सविस्तर लिहून प।। मित्ति माघ वद्य १४ शुक्रवार. हे विज्ञापना. श्रीमंतांस पत्रें देऊन उत्तर घेऊन पाठविलें आहे. र॥ शिंदे, होळकर यांस पत्रें सरकारीं घेऊन पाठविलीं आहेत. प॥ हे विज्ञापना.

पे॥ मित्ती चैत्र वद्य १२ सं. १८१६.