Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[१६४] ।। श्री ।। १४ फेब्रुआरी १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. “अबदाली नजीबखानाकडे जाऊन त्यास व पारच्या रोहिल्यास मेळवून घेऊन दिल्लीच्या रोखें आला. उद्या परवा मुकाबला होईल.” ह्मणोन लिहिले ते कळलें. बहुधा मुकाबला जाला असेल. परस्परें मुकाबला जाल्याचें वर्तमान येतें. परंतु तुह्मीं काहींच लिहिलें नाहीं, हे कोण गोष्ट ! लढाई कसकशी जाली? राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री जनकोजी शिंदे व दत्ताजी शिंदे येकत्र होऊन युद्ध जालें किंवा जनकोजी शिदे यांचेच फौजेशीं युद्ध जाहलें ? ते तपशीलवार लेहून पाठविणें. प्रस्तुत सरदार मनसुबा काय करितात ? व अबदाली कोठें आहे ? काय मनसुबा करितो, ते बातमी येतच असेल. सविस्तर लिहिणें. या दिवसांत तुह्मीं जलद जलद वर्तमान लिहीत जाणें. जाणिजे छ २६ जमादिलाखर, सु।। सितैन मय्या व अल्लफ. +इकडील मोगल मारल्यादाखल करून पंचेचाळीसाची२३६ जागीर, बराणपुर, अशेर, दौलताबाद घेतली. गुंता उरकला. याउपर सत्वर फौजा पोहोचल्या. जाणजे. मल्हारबांनीं जाट, मनसुरअल्लीचा लेक लगामीं राखावा. बाजी राखावी. हे विनंति.